लातूर : प्रतिनिधी
तालुकासतरीय विज्ञान प्रदर्शन येथील नांदेड रोडवरील यशवंत विद्यालयात दि. ११ व १२ डिसेंबर रोजी उत्साहात झाले. या प्रदर्शनात केंद्र स्तरावरुन निवड झालेल्या एकुण ८४ प्रयोगांची मांडणी करण्यात आली होती. या प्रयोगातून विद्यार्थ्यांनी विज्ञानाचा अनुभव घेतला. विज्ञान विषयाचे अनेक मॉडेल विज्ञान प्रदर्शनात ठेवण्यात आले होते. विद्यार्थ्यांना विज्ञान विषयात गोडी निर्माण रस निर्माण व्हावे व विज्ञान विषय सहज कसा शिकता येईल या अनुषंगाने अगस्त्य फाउंडेशन कार्य करते. या प्रदर्शनाला लातूर महानगपालिका व शहरातील विद्यार्थी शिक्षक व पालकांनी भेट देऊन विविध प्रयोगाची माहिती घेतली. या प्रदर्शनाचे उद्घाटन शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्ध्यापक सुवर्णा जाधव, गीतांजली पाटील, स्वप्नील मनाले, जिजामाता कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका प्रमिला भोसले, अगस्त्य फाउंडेशनतर्फे सानिया शेख यांची उपस्थिती होती.
विविध शाळेतील शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी बनवलेले भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित या विषयाच्या मूलभूत संकल्पनांवर आधारित प्रयोग प्रदर्शनात माडण्यात आले होते. यशवंत विद्यालय लातूर, जिजामाता कन्या प्रश्नाला लातूर व शहरातील जिल्हा परिषद व महानगरपालिकेच्या सर्व शाळांचा विशेष सहभाग होता. विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका डॉ. सूवर्णा जाधव, पर्यवेक्षक दयानंद कांबळे, डॉ. नरसिंग वाघमोडे, एन. सी. सी. विभागाचे चिफ ऑफिसर महावीर काळे, एन. सी. सी. कॅडेट्स, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.