27.1 C
Latur
Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रविधानसभा निवडणूकीसाठी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी

विधानसभा निवडणूकीसाठी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी

पुणे : विनायक कुलकर्णी
सर्वच राजकीय पक्षांतील इच्छुकांना आता येणा-या विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यादृष्टीने विविध राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात महायुतीला आणि महाविकास आघाडीला प्रत्येकी दोन दोन जागांवर विजय संपादन करता आला पण आता बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये संभाव्य राजकीय चित्र कसे असेल यादृष्टीने चर्चा सुरू झाली आहे.विधानसभेची पंचवार्षिक निवडणूक येत्या दोन-तीन महिन्यांत होण्याच्या दृष्टीने राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

निवडणुका महायुती आणि महाविकास आघाडी मित्रपक्षांच्या बरोबरच लढणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यादृष्टीने जागा वाटपाबाबत बोलणी सुरू झाली असून संभाव्य उमेदवारांची चाचपणी करण्यात येत आहे. जिल्ह्याचा विचार करता शहर आणि जिल्ह्यात एकूण २१ जागा विधानसभेच्या आहेत त्यामध्ये ८ जागा या पुणे शहरात तर तीन जागा पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात आहेत. आणि उर्वरित जागा ग्रामीण भागात आहेत.

जिल्ह्याच्या सुरुवातीपासूनच्या राजकीय परिस्थितीवर काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वरचष्मा राहिला आहे मात्र गेल्या काही वर्षांत केंद्रात आणि राज्यात ज्याप्रमाणे राजकीय स्थित्यंतरे होत गेली त्यानुसार जिल्ह्याच्या राजकीय पटलावर बदल होत गेले असल्याचे दिसते. एक मात्र नक्की की सतत कमी-अधिक प्रमाणात बदल होत राहिले. आता पुन्हा एकदा जिल्ह्यातील संभाव्य बदलाची आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रचिती येणार का असा प्रश्न उपस्थित करण्यात येतो आहे.

काँग्रेस पक्षाने उमेदवारी निवडीबाबत आघाडी घेतली असल्याचे दिसते. म्हणजेच पक्षाने शहरातील आठ विधानसभा जागांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया पूर्ण केली. सध्याच्या परिस्थितीत काँग्रेस पक्षाकडे आठपैकी एकच जागा ती म्हणजे कसबा विधानसभा मतदारसंघाची आहे. तर अन्य सात जागा महायुतीकडे आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत आठ जागांमध्ये कोणाचे वर्चस्व राहणार आहे हे लवकरच कळेल. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे. ही स्थिती जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने नुकतीच पश्चिम महाराष्ट्राची आढावा बैठक घेण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR