23.5 C
Latur
Wednesday, September 25, 2024
Homeलातूरविधानसभेत काँग्रेसचा तिरंगा मंत्रालयावर फडकावण्यासाठी सक्रीय होऊन काम करावे

विधानसभेत काँग्रेसचा तिरंगा मंत्रालयावर फडकावण्यासाठी सक्रीय होऊन काम करावे

लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची रणधूमाळी आता सुरु होत आहे. या निवडणुकीत काँग्रेसचा तिरंगा मंत्रालयावर फडकवण्यासाठी सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी सक्रिय होऊन काम करावे, असे आवाहन राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतीक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले.
लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे निरीक्षक आमदार आर. ए. वसंतकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. २५ सप्टेंबर रोजी सकाळी लातूर शहरातील काँग्रेस भवन येथे लातूर जिल्हा व लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार त्र्यंबक भिसे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, सरचिटणीस मोईज शेख, सचिव अभय साळुंके, लातूर जिल्हा काँग्रेज कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, लातूर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा शिलाताई पाटील, लातूर शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा स्मिता खानापुरे, माजी नगराध्यक्षा उषाताई कांबळे, माजी महापौर दीपक सुळ, एकनाथ पाटील, व्यंकटेश पुरी, इम्रान सय्यद, विजयकुमार साबदे, प्रा. प्रविण कांबळे आदीसह काँग्रसचे सर्व फ्रंटलचे अध्यक्ष,सर्व तालुका अध्यक्ष, पदधिकारी उपस्थित होते.
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकांची रणधूमाळी सुरु होत आहे, येणा-या काळात काँग्रेसचा तिरंगा मंत्रालयावर फडकेल आपणाला काँग्रेस पक्षाला आणखी पुढे घेवून जायचे आहे. मागील विधानसभा निवडणूकीत लातूर शहर व लातूर ग्रामीण विधानसभेच्या जागा काँग्रेसने जिकंल्या पण निलंगा व औसा विधानसभा जिंकता आल्या नाहीत, याचे आम्हाला दु:ख आहे. अहमदपूर व उदगीर विधानसभेच्या जागा ही काँग्रेसला मिळाल्या पाहिजेत. महाविकास आघाडीत महाराष्ट्रातील सर्व समाजाला प्रतिनिधीत्व दिले जाते बारा बलुतेदारांनाही निवडणूकीत संधी दिली जाईल. उदगीरमध्ये काँग्रेसची ताकद जास्त आहे अहमदपूर विधानसभेची जागा ही काँग्रेस पक्षाला सोडावी लातूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला जास्तीत जास्त विधानसभेच्या जागा मिळाल्या पाहिजेत असे, त्यांनी सांगितले. पुढे बोलतांना ते म्हाणाले की, मराठवाड्यात सहा जागा एस्सीच्या राखीव आहेत त्या एस्सीमधील जातींना सम प्रमाणात मिळाल्या पाहिजेत.
महाराष्ट्र हे देशातील प्रगतशील राज्य आहे. मुंबई ही देशाची आर्थीक राजधानी आहे महाविकास आघाडी सरकारने कोराना काळात चांगले काम करुन करोडो लोकांना मदत केली, महायुती सरकारच्या काळात बेराजगारी महागाई वाढत चालली आहे. शेतक-यांच्या आत्महत्या वाढत आहेत, राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.  तसेच राज्यातील उद्योग दुसरीकडे जात आहेत हे महायुती सरकार लोकांच्या हीताचे काम करीत नाही, असे ते म्हणाले.
लातूर लोकसभा मतदार संघाचे काँग्रेसचे निरीक्षक आमदार आर. ए. वसंतकुमार म्हणाले, लातूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक काँग्रेस पक्षाने विक्रमी मताधिक्याने जिकंली त्याबद्दल सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो. येत्या विधानसभा निवडणूकीची तयारी आपणाला आत्तापासूनच करायची आहे. महाराष्ट्र राज्यात काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांचे महाविकास आघाडी गठबंधन आहे. जेथे जो पक्ष मजबूत असेल तेथील विधानसभेची जागा त्या पक्षाला मिळेल, असे त्यांनी सांगितले पुढे बोलतांना ते म्हणाले की, परिणामकारक काम करणा-या काँग्रेस कार्यकर्त्याला संधी दिली जाईल. काँग्रेस कार्यकर्त्यांनी देश राज्य व जिल्ह्यातील स्थानीक समस्यावर जनतेत जाऊन चर्चा करावी.
कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने जनतेला पाच गँरटी दिल्या तशा गँरटी महाराष्ट्रातील जनतेला आम्ही देऊ लातूर लोकसभा मतदार संघात काँग्रेस पक्ष मजबूत आहे जिल्ह्यातील विधानसभेच्या जास्तीत जास्त जागा काँग्रेसला सोडवून घेवू. देशात सध्या चर्चा होत आहे की, महाराष्ट्र राज्यात काँग्रेस महाविकास आघाडीचे
सरकार येणार आहे काँग्रेसचा मुख्यमंत्री  होणार आहे तसे  झाल्यावर देशातील मोदी सरकार सत्तेवर राहणार नाही कारण ते बहुमताचे सरकार नाही तर ते तुकडे तुकडे गँगचे सरकार आहे असे ते म्हणाले.
याप्रसंगी अ‍ॅड. समद पटेल, विजय देशमुख, सुभाष घोडके, प्रवीण सूर्यवंशी, सचिन बंडापल्ले, रविशंकर जाधव, अनिल चव्हाण, अ‍ॅड.देविदास बोरुळे-पाटील, आयुब मणियार, बालाजी साळुंके, बाळासाहेब देशमुख, गणेश देशमुख, रामराजे काळे, रमेश सूर्यवंशी, मारोती पांडे, सिराजउद्दीन जहागीरदार, मुकेश राजमाने, अहमदखा पठाण, डॉ. दिनेश नवगिरे, अमर मोरे, शरद देशमुख, सुंदर पाटील कव्हेकर, संजय जगताप, अमित जाधव, दगडूप्पा मिटकरी, नागसेन कामेगावकर, अक्षय मुरुळे, तबरेज तांबोळी, सुलेखाताई कारेपूरकर, अ‍ॅड. सुनंदा इंगळे, अ‍ॅड. सुनीत खंडागळे, अभिजित इगे, अभिषेक पतंगे, महेश कोळे, ख्वॉजामिया शेख, युसूफ बाटलीवाला, सागर मुसंडे, अ‍ॅड. गोपाळ बुरबुरे, विष्णुदास धायगुडे, विजय टाकेकर, अमोल गायकवाड, धनराज गायकवाड, पिराजी साठे, अ‍ॅड. विजय गायकवाड, अ‍ॅड. अंगद गायकवाड, राहुल डूमणे मंगेश वैरागे, गिरीश ब्याळे, सचिन कोतवाड, शफी शेख उपस्थित होते आढावा बैठकीचे प्रास्तावीक लातूर शहर जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे यांनी केले तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर सरचिटणीस मोईज शेख, सचिव अभय साळुंके ,एकनाथ पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या बैठकीचे सुत्रसंचालन प्रा. ओमप्रकाश झुरळे यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR