तिरुचिरापल्ली : आज तामिळनाडूतील त्रिची विमानतळावर एका महिलेला अटक करण्यात आली आहे. विमानतळाच्या एअर इंटेलिजन्स युनिट (एआययू) ने महिलेला अटक केली आहे. अधिका-यांनी महिलेकडून २,२९१ ग्रॅम सोने जप्त केले आहे, ज्याची किंमत कोट्यावधी रुपये आहे. महिला प्रवाशाकडून सापडलेले सोने २४ कॅरेट आणि २२ कॅरेट शुद्धतेचे आहे. कस्टमला न कळवता सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप महिलेवर आहे.
कस्टम अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिची विमानतळावर एआययूच्या पथकाने मंगळवारी एका महिला प्रवाशाला अटक केली. या महिलेकडून अंदाजे १.५३ कोटी रुपयांचे २,२९१ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.दरम्यान, गेल्या महिन्यातही तिरुचिरापल्ली विमानतळावर सिंगापूरहून आलेल्या एका प्रवाशाला १ कोटींहून अधिक किमतीचे सोने पकडण्यात आले होते.