लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आदरणीय विलासराव देशमुख यांच्या ७९ जयंतीनिमित्त आज शुक्रवार दि. २६, मे रोजी सकाळी ९.०० वाजता , बाभळगाव येथिल विलासबागेत सार्वजनिक आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री म्हणून मंत्री म्हणून आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांनी असंख्य कल्याणकारी निर्णय घेतले. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात लोकहित डोळ्यासमोर ठेवून घेतलेले गेलेले अनेक निर्णय ऐतिहासीक ठरले आहेत. शेतक-यांना दिलेली कर्जमाफी, वीजबील माफी, कर्जाचे पुर्नगठन, व्याजात दिलेली सवलत, फलोत्पादन विकासासाठी दिलेल्या प्रोत्साहन, दुष्काळी परिस्थितीत केलेल्या उपाययोजना, गारपीटीग्रस्त शेतक-यांंना केलेली मदत, विदर्भातील शेतक-यांना दिलेले विशेष पॅकेज, पशुधन जगविण्यासाठी राबवलेली मोहीम यासह त्यांच्या कार्यकाळातील उपाययोजना, राज्यातील शेतक-यांसाठी वरदान ठरल्या आहेत, विविध योजनांच्या माध्यमातून शेती विकासाला चालना देऊन ग्रामीण भागाचा कायापालट करीत असतानाच उद्योग, व्यापार वृद्धीसाठी नियोजन करून राज्याचा समतोल विकास साधण्याची त्यांची कृती आजही मार्गदर्शक ठरते आहे.
राजकारणातले आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची ओळख राहिली आहे. लोकाभिमुख नेतृत्व आणि प्रसन्न व्यक्तिमत्व म्हणून ते सर्व परिचित होते. अशा लोकविलक्षण अष्टपैलू नेतृत्वाच्या जयंतीनिमित्त दरवर्षी राज्यभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. यावर्षी त्यांच्या ७९ व्या जयंतीनिमित्त आज रविवार दि. २६, मे रोजी बाभळगाव येथील विलासबाग येथे आयोजित सार्वजनिक जयंती सभेतून त्यांच्या कार्याला स्मरणपूर्वक आदरांजली वाहण्यात येणार आहे. या सभेसाठी सकाळी सर्वांनी ८.४५ वाजता विलासबाग येथे स्थानापन्न व्हावे अशी अपेक्षा आहे.
सकाळी ९.०० वाजता सुप्रसिद्ध सिने पार्श्वगायक गायक मंगेश बोरगावकर व त्यांच्या सहका-यांकडून शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून ‘भावस्वरांजली’ हा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. उपस्थित सर्वांनी पुष्पांजली अर्पण केल्यानंतर १०.०० वाजता आदरांजली सभेचा समारोप होईल. या सभेचे सुत्रसंचालन बाळकृ्ष्ण धायगुडे व संचिन सुर्यवंशी करणार आहेत. या आदरांजली कार्यक्रमास विलासबाग, बाभळगाव येथे जनतेने आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन देशमुख कुटूंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.