29 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeलातूरविलास साखरच्या चेअरमन वैशालीताई देशमुख यांचा वाढदिवस साजरा

विलास साखरच्या चेअरमन वैशालीताई देशमुख यांचा वाढदिवस साजरा

लातूर : प्रतिनिधी
तालुक्यातील वैशालीनगर, निवळी येथील विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या  वाढदिवसानिमित्त दि. १० ऑक्टोबर रोजी विविध क्षेत्रातील मान्यवर, संस्थाचे पदाधिकारी, संचालक मंडळ, कार्यकर्ते, अधिकारी यांनी त्यांची बाभळगाव निवासस्थानी भेट घेऊन अभिष्टचिंतन करुन उत्तम आरोग्य व उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुखजी यांचा गुरुवारी बाभळगाव निवासस्थान येथे साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. विविध क्षेत्रातील मान्यवर, संस्थाचे पदाधिकारी, संचालक मंडळ, कार्येकते, अधिकारी यांनी त्यांची बाभळगाव निवासस्थानी जाऊन भेट घेतली अभिष्टचिंतन करुन सर्वांनी त्यांना उदंड आयुष्य लाभावे, अशा शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी आमदार वैजनाथराव शिंदे, माजी चेअरमन धनंजय देशमुख, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष किरण जाधव, विलास कारखान्याचे व्हाईस चेअरमन रविंद्र काळे, रेणा सहकारी साखर कारखाना व्हाईस चेअरमन अनंतराव देशमुख, व्हाईस चेअरमन विजय देशमुख,  जागृतीचे व्हाईस चेअरमन लक्ष्मण मोरे, व्हाईस चेअरमन समद पटेल, विलास कारखन्याचे कार्यकारी संचालक सजीव देसाई, कार्यकारी संचालक जितेद्र सपाटे, जिल्हा परीषदचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, अभय सांळुके, ऋषिकेश पाटील, सत्तार शेख, रईस टाके, संगीता मोळवणे, उर्मीला मुगळे, अजय बोराडे, रुपाली बोराडे, संचालक राजकूमार पाटील, सुंदर पाटील कव्हेकर, युनुस मोमीन, संचालक संग्राम माटेकर, विनोद वीर, युसुफ शेख, बाभळगाव उपसरपंच गोविंद देशमुख, कारखान्याचे अधिकारी मच्छिंद्र बोरखडे, एल. एम. देशमुख, ओमकार ठाकरे, दिलीप जाधव, रविकिरण सोमवंशी, धैर्यशील निंबाळकर, श्रीराम शिंदे, नारायण काळूंखे, साहेबराव जगताप, पांडुरंग कदम यांच्यासह विविध संस्थाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांना भेटून शुभेच्छा दिल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR