24.3 C
Latur
Wednesday, January 8, 2025
Homeलातूरविवेकानंद चौक ते बाभळगावपर्यंतच्या रस्ता दुभाजकाची स्वच्छता

विवेकानंद चौक ते बाभळगावपर्यंतच्या रस्ता दुभाजकाची स्वच्छता

लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्याकडे लातूर शहरातील पोचम्मा गल्ली येथील राजूभाऊ शिवाजी गवळी यांनी एक निवेदन देऊन विवेकानंद चौक ते बाभळगावपर्यंतच्या रस्ता दुभाजकाची अत्यंत दयनीय स्थिती असल्याचे निदर्शनास आणून दिले. याची राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांना सूचना दिल्या आणि उपरोक्त रस्ता दुभाजक स्वच्छ करुन सुशोभित करण्यात येत आहे.
मनपाकडून सर्वप्रथम दुभाजकावरील सर्व प्रकारचा कचरा काढून टाकण्यात आला, दुभाजकावरील काटेरी झुडपे काढून टाकली, दुभाजकामधील मृदाची सुधारणा करण्यात येत आहे. दुभाजकावर विविध प्रकारची फुले लावून तो सुंदर दिसण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच यानंतर या परिसराची नियमित स्वच्छता करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. या कामामुळे लातूर शहराच्या सौंदर्यात निश्चीत भर पडणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR