सोलापूर (प्रतिनिधी)
एक महान विचारवंत, समाजसुधारक स्वामी विवेकानंद हे एक संत नाहीत तर समाजाला नवी दिशा देणारे दीपस्तंभ आहेत त्यांच्या शिकवणीचा योग्य उपयोग केल्यास परिस्थिती सुधारेल आणि भविष्य अधिक उज्वल होईल.त्यांची शिकवण ही फक्त इतिहास नाही तर ती भविष्याची तयारी आहे असे मत साने गुरुजी कथामालाचे तालुकाध्यक्ष परमेश्वर व्हसुरे यांनी व्यक्त केले. ते श्री स्वामी समर्थ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अक्कलकोट येथे स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय युवा दिनाच्या प्रसंगी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर औद्योगिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजशेखर हिप्परगी यशवंत घोंगडे विजय इंगळे विजयकुमार पाटील प्राचार्य दिलीपकुमार गायकवाड मेहबूब नदाफ आदी मान्यवर उपस्थित होते. युवा दिनानिमित्त निबंध स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा,चित्रकला स्पर्धा,आपल्या आवडीचे छंद व तंत्रप्रदर्शन घेण्यात आले विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
व्हसुरे म्हणाले विवेकानंदाच्या शिकवणीमुळे मानवतेला नवीन दिशा मिळेल जर त्यांच्या शिकवणीला प्रत्यक्ष कृतीत आणलं तर जग अधिक समृद्ध,न्याय आणि परिपूर्ण होऊ शकेल विवेकानंदाचे विचार फक्त प्रेरणा नाही तर ते भविष्याचा मार्गदर्शक दीप आहेत. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलेश घोडके, सातप्पा बगले,अक्षय वाघमारे,दिनेश मंठाळे,अमोल,बिराजदार, विश्वनाथ कोनापुरे,संतोषकुमार सोननद,प्रशांत स्वामी, वैशाली कलबुर्गे,प्रियांका गजेश्री शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेतले.