वाराणसी : वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिरात स्पर्श दर्शनादरम्यान एक महिला अर्घामध्ये पडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या घटनेशी संबंधित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. मंदिर प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. त्यानंतर स्पर्श दर्शनावर बंदी घालण्यात आली होती. आता निष्काळजीपणावर कारवाई सुरू झाली आहे. याप्रकरणी चार उपनिरीक्षकांसह आठ पोलिसांना निलंबित करण्यात आले. पोलीस प्रशासनाने ही माहिती दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, भाविकांची गर्दी अचानक वाढल्याने स्पर्श दर्शन करत असताना महिला घसरून शिवल्ािंगाजळ पडली. त्यानंतर पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, गर्भगृहात तैनात चार उपनिरीक्षक, एक पुरुष हवालदार आणि तीन महिला हवालदारांनी त्यांच्या कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यामुळे गर्दी जमली आणि ही घटना घडली. त्यानुसार पोलिसांनी या पोलीस कर्मचा-यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
व्हीव्हीआयपी आणि मोठ्या देणगीदारांना योग्य स्पर्श दर्शन दिले जाते आणि सामान्य भाविकांसाठी कोणतीही व्यवस्था केली जात नाही, अशी टीका नेटक-यांनी केली.