लातूर : प्रतिनिधी
विहार म्हणजे काय? विहार ही संकल्पना पूर्वी काय होती आणि आज विहाराचे कार्य काय आहे याचे चिंतन होणे गरजेचे आहे. विहार हे परिवर्तनाचे आणि चळवळीचे केंद्र आहे आणि त्या पध्दतीने काम झाले पाहिजे असे विचार येथील राजर्षी शाहू महाविद्यालयातील पाली भाषेचे अभ्यासक डॉ. भिमराव पाटील यांनी केले.
वर्षावासनिमित्त कुशीनारा बुद्ध विहार, म्हाडा कॉलनी, लातूर येथे आयोजित व्याख्यानात ते बोलत होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौध्द महासभेचे महाराष्ट्र प्रवक्ता प्रा. बापू गायकवाड हे होते. तथागताचे मूळ विचार पालिभाषेत असून पाली भाषा ही ज्ञान भाषा आहे. ती प्रज्ञा, शील आणि करुणा शिकवणारी भाषा आहे. त्यासाठी पाली भाषा शिकणे आज काळाची गरज आहे. भारताचा सत्य शुद्ध इतिहास समजून घेण्यासाठी पाली भाषा शिकणे काळाची गरज आहे. जे बुद्ध वाचतात तेच बुद्धीवादी आणि विवेकवादी बनतात आणि त्यातूनच विवेकवादाचा अधीष्ठान असलेला प्रगत समज घडतो म्हणूनच केंद्र सरकारने या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन गौरव केला आहे, असे विवेचन डॉ. भीमराव पाटील यांनी केले.
त्यांनी यावेळी बुद्धांचे तत्वज्ञान, बुद्ध,धम्म आणि संघ ही संकल्पना समजावून सांगितली. सर्व समाजांनी बुद्ध स्वीकारावा आणि आपली वैचारिक प्रगती घडवावी, असे प्रतिपादन त्यांनी केले. याप्रसंगी डी.एस.नरंिसगे, कापुरे,राहुल गायकवाड, करुणा कांबळे, हजारेताई, दयानंद बटनपूरकर, दिलीप हरणे, जोगदंड, पवन कांबळे, बोपणीकर, दुधाळे यांच्यासह बौद्ध उपासक उपस्थित होते.