सोलापूर : पोलिस असल्याची बतावणी करून एका वृद्ध महिलेची फसवणूक करून तिच्या हातातील सोन्याच्या बांगड्या घेऊन पसार झालेल्या तिघांना, एक मोटरसायकलचोर व एक मोबाईल चोर अशा कूण पाच जणांना सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले आहे. त्यांच्याकडून एकूण चार गुन्हे उघडकीस आणून चार लाख ७२ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
जुळे सोलापूर येथील संतोषी माता मंदिर जवळील एलआयसी ऑफिसच्या बोळामध्ये अनोळखी इसमाने ६५ वर्षीय वृद्ध महिलेस थांबून मी साध्या वेषातील पोलीस आहे. मला ड्युटीसाठी पाठवले आहेवृद्ध महिलेचा विश्वास संपादन केला. वृद्ध महिलेच्या बांगड्या काढून कागदामध्ये गुंडाळून गुंडाळलेला कागद वृद्ध महिलेस न देता हात चलाखी करीत स्वतः कडे ठेवून त्याऐवजी स्टीलचे गुंडाळलेला कागद महिलेच्या पर्समध्ये ठेवून निघून गेला.
याबाबत विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. गुन्हे शाखेकडे पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख व त्यांच्या पथकाने हा गुन्हा घडल्यापासून पाचमहिन्यानंतर गोपनीय माहितीच्या आधारे सराईत गुन्हेगार कासिम बेग ईराणी रा. इराणी वस्ती, शिवाजीनगर पुणे मोहम्मद उर्फ जॉर्डन ईराणी रा. खोजा कॉलनी ईराणी वस्ती, सांगली यांना ताब्यात घेऊन चौकशी गुन्ह्याची कबुली दिली. अधिक माहिती घेतली असता सोनार सुनील मानगांवकर वय ५५, रा. मिरज सांगली याला अटक करून चार लाख रुपये किमतीच्या चार सोन्याच्या बांगड्या जप्त करून हा गुन्हा उघडकीस आणला.
एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल असलेला मोटरसायकलचा गुन्हा सागर येमुल (वय ३२ रा. बोळकोटे नगर पिठाच्यागिरणी मागे एमआयडीसी) यांच्याकडून उघडकीस आणला. तसेच फौजदार चावडी आणि जोडभावी पोलीस ठाणे येथील प्रत्येकी एक मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले.कासिम युसुफ बेग याच्यावर महाराष्ट्र व इतर राज्यात मिळून पाच गुन्हे दाखल आहेत. मोहम्मद उर्फ जॉर्डन युसुफ ईराणी याच्यावर महाराष्ट्र व इतर राज्यात मिळून १४ गुन्हे दाखल आहेत. सुनील वामनराव मानगांवकर यांच्यावर महाराष्ट्र व इतर राज्यात मिळून १४ गुन्हे दाखल आहेत.