30.1 C
Latur
Sunday, June 30, 2024
Homeलातूरव्यवहारकुशल, ज्ञानी माहेश्वरी समाजाने राज्यात आपले अस्तित्व प्रस्थापित केले 

व्यवहारकुशल, ज्ञानी माहेश्वरी समाजाने राज्यात आपले अस्तित्व प्रस्थापित केले 

लातूर : प्रतिनिधी
समाजाला उत्कर्षाकडे न्यायचे असेल तर, सकारात्मकतेने पुढे गेले पाहिजे, समाजातील प्रत्येकाने आपापला इगो बाजूला ठेवून समाजासाठी काम केले तर आपल्या समाजाची उन्नती अटळ आहे. आपला व्यवहारकुषल, ज्ञानी अशी ओळख असलेल्या माहेश्वरी समाजाने राज्यात आपले अस्तीत्व प्रस्थापित केले. याचे मोठे समाधान आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभा अध्यक्ष मधुसूदन गांधी यांनी केले.
ते लातूर जिल्हा माहेर्श्वरी समाजाच्या वतीने आयोजित महेश पुरस्कार समारंभ प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी अ­खिल भारतीय माहेश्वरी महासभेचे संयुक्त मंत्री  जुगलकिशोरजी लोहिया यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे मराठवाडा उपाध्यक्ष  राजकुमारजी पल्लोड, मंत्री सत्यनारायणजी सारडा, युवा संघटन अध्यक्ष विनितजी तोष्णीवाल, संयुक्त मंत्री नंदकिशोरजी तोतला, भूतपूर्व अध्यक्ष श्रीकिशनजी भन्साळी,  ओंकरनाथजी मालपाणी, महेश सेवा निधी कार्याध्यक्ष ब्रिजगोपलजी तोष्णीवाल, भूतपूर्व मंत्री मदनलालजी मणियार,ा जनसंपर्क मंत्री ओमप्रकाशजी तापडिया, महिला संघटन प्रदेश उपाध्यक्ष अनिताजी अशोकजी मालू, युवा संघटन व सहकार मंत्री रामजी भुतडा यांची प्रमुख उपस्थिती होती.
  यावेळी समाजासाठी अतुलनिय योगदान देणा-यांचा माहेश्वरी समाजातील अनेक समाजबांधवांनी समाजासाठी अतुलनिय योगदान दिले आहे. अशा मान्यवर व्यक्तींचा समाजाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महेश भूषण, महेश गौरव, व महेश रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामध्ये प्रल्हाद रामगोपाल बाहेती, लक्ष्मीनारायण रामानुज गिल्डा, राजकुमार हरिकिशन सोनी, यांना महेश सेवा पुरस्कार, कुमुदिनी शामसुंदर भार्गव, डॉ. पवन सत्यनारायण लढ्ढा, डॉ. हनुमान विष्णुदास चांडक यांना महेश गौरव, तर यावर्षी प्रथमच स्व. प्रदिप धूत यांना मरणोत्तर महेशरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
याबरोबरच माहेश्वरी आवास योजनेसाठी १ एकर जमीन दान देणा-या अलका साडी सेंटरचे संचालक आलोक धूत, ओमप्रकाश डागा, गौरव बाहेती, प्रकाश लाहोटी, पुरुषोत्तम कालिया, लक्ष्मीकांत कालिया,  मधुसूदन भुतडा, मंत्रराज भुतडा, जयराम भुतडा, हृषीकेश भुतडा, हेमंत नावंदर, अभिषेक नावंदर, अशोक भुतडा, नुरवी सागर गिल्डा, नंदकिशोर बलदवा, धनराज पल्लोड, सुनील राठी, बलाकिषन मुंदडा, शाम भट्टड यांचाही समाजाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी अ­खिल भारतीय माहेश्वरी महासभेचे संयुक्त मंत्री जुगलकिशोरजी लोहिया यांनी लातूरात रत्नांची खान आहे. येथे माहेश्वरी सभेचे अनेक चांगले काम सूरू असुन, येथे आले की ऊर्जा मिळते अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली. पुरस्कार प्राप्त यांच्या वतीने कुमुदिनी भार्गव आपले मनोगत व्यक्त करतांना समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करीत हे पुरस्कार त्यांनी समाजासाठी काम करणा-या प्रतयेकाला समर्पित केला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात लातूर जिल्हा माहेश्वरी सभा अध्यक्ष सी ए प्रकाश कासट यांनी माहेश्वरी सभा लातूरच्या वतीने राबवीत असलेल्या उपक्रमांची महिती दिली.
याशिवाय यावेळी  सचिव फुलचंद काबरा, कोषाध्यक्ष जगदिश भुतडा, संघटनमंत्री विजयकुमार चांडक, महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभा उपाध्यक्ष ,अखिल भारतीय सदस्य हुकुमचंद कलंत्री, बलकिशन मुंदडा, उपाध्यक्ष ओमप्रकाश सारडा, जयप्रकाश खटोड, मधुसूदन सोनी, दिपक भुतडा अहमदपूर, डॉ. राजेंद्र बाहेती मुरूड, महा प्रदेश कर्यासमिती सदस्य राजेशकुमार मंत्री, संयुक्त मंत्री गोकुळदास चांडक, राजगोपाल बाहेती, सहसंघटन मंत्री पुरुषोत्तम कालिया, रामनिवास धूत, महेश आवास प्रमुख गोंिवद कोठारी, सहकोशाध्यक्ष प्रल्हाद चांडक, आय टी सेल अशोक जाजू, मीडिया व प्रचार मंत्री शाम भट्टड, राजकुमार सोनी, कार्यालय मंत्री चांदकरण लढ्ढा, सांस्कृतिक व क्रीडा प्रमुख अजय तापडिया, महेश सेना अध्यक्ष संतोष तोष्णीवाल, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य ईश्वर बाहेती, दिलीप सोमाणी, रामेश्वर गिल्डा, नंदकिशोर सोनी, रामेश्वर भराडिया, शामसुंदर सोनी, भारतलाल धूत, सल्लागार मंडळ लक्ष्मीरमण लाहोटी, सुरेश मालू, लक्ष्मीकांत सोमाणी, रमेश बियाणी, सुभाष सोमाणी, रमेश राठी, शामसुंदर खटोड, लातूर जिल्हा माहेश्वरी महिला संघटन मंगल लढ्ढा, ललिता राठी, लातूर शहर माहेश्वरी सभा अ‍ॅड. नंदकिशोर लोया, विष्णूप्रसाद सारडा, लातूर जिल्हा माहेश्वरी युवा संघटन, युवा माहेश्वरी लातूर, माहेश्वरी किशोरी मंडळ लातूर, महेश भूषण निवड समिती प्रमुख हुकूमचंद कलंत्री, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी सदस्य आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. गोपाल बाहेती व सौ. दिपाली रांदड यांनी केले  शेवटी फुलचंद काबरा यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR