सोलापूर : आयकरातील अन्यायकारक तरतुदी रद्द करून महाराष्ट्रात व्यापारी कल्याण बोर्ड स्थापन करावे अशी मागणी भारतीय उद्योग व्यापार महामंडळाचे राष्ट्रीय सचिव व चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रवक्ते पशुपती माशाळ यांनी केली आहे. महामंडळाच्या राष्ट्रीय सभेत त्यांनी व्यापाऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधले. आयकराच्या नवीन नियम धारा ४३ बी (एच) व्यापाऱ्यांनी आयकर कायद्यातील नवीन कलमानुसार जर सूक्ष्म किंवा लघु उद्योजकाकडून (एमएसएमई) माल घेतला असेल तर त्यापोटी देय रक्कम ही ४५ दिवसांच्या आत देणे बंधनकारक आहे.
ते अन्यायकारक असल्याने त्यास आहे, तो अन्यायाकार जी.एस.टी. मधील खात्री झाल्याशिवाय नोटीस बजावूनछापे मारणे व धारा कलम ६७ सी प्रमाणे शिथिल करावे. २०१७-१८ च्या प्रलंबीत प्रकरणांना अभय योजना द्यावी. एफ. डी. ओ. कायद्यानुसार परवाना आजीवन करावा. जाचक अटी रद्द कराव्यात. सरकारी मोफत रेशनऐवजी लाभार्थीच्या खात्यात रक्कम जमा करावी आदी मागण्या केल्या.महामंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबुलाल गुप्ता, मुकुंद मिश्रा, उपाध्यक्ष मोहन गुरनानी, किशोर खारावाला, मध्य प्रदेशचे बाबूलाल अग्रवाल, पंढरपूरचे शुभम पाटील यांच्यासह देशातील ९०प्रतिनिधी उपस्थीत होते.