कोल्हापूर : कडाक्याच्या उन्हात सर्वचजण लस्सी, ताक, किंवा शीतपेयं पितात… मात्र जर तुम्ही रस्त्यावरील शीतपेय पीत असाल तर सावधान. कारण कोल्हापुरात चक्क शीतपेयांमध्ये मृतदेहावरील बर्फाचा वापर केल्याचा किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. रस्त्यावरील एक शीतपेय विके्रता शववाहिन्यांतील फेकून दिलेल्या बर्फाचा वापर पाणी, ताक आणि मठ्ठ्यामधे करत होता. काही जागरूक नागरिकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी या शीतपेय विक्रेत्याला चोप दिला आहे.
छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात मृतदेह ठेवण्यासाठी वापरला जाणारा बर्फ चक्क थंड पेयासाठी वापरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयाच्या समोरच असलेल्या हातगाडीवर हा सर्व प्रकार घडत असे. शनिवारी सामाजिक कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी या हातगाडीवाल्याला चांगलाच चोप दिला आहे.
सीपीआर रुग्णालयाच्या बाहेर नारळ पाणी, ताक आणि मठ्ठा विकणारी हातगाडी आहे. यातील हातगाडीवर रुग्णवाहिकेने मृतदेह सोडून आल्यावर बर्फाची लादी गटारात टाकली जाती. ही बर्फाची लादी शीतपेये थंड करण्यासाठी वापरत असल्याचा अजब प्रकार समोर आला आहे.
शुक्रवारी एका रुग्णवाहिकेने मतृदेह सोडून आल्यानंतर राहिलेला बर्फ सीपीआरसमोरील गटारात टाकून दिला. हा बर्फ धुऊन थंडपेय, पाणी आणि सरबतासाठी नेत असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात येताच त्याच्यावर लक्ष ठेवून नागरिकांनी त्याला शनिवारी पकडले. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यावर नागरिकांनी त्याला चांगलाच चोप दिला.