22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeपरभणीशहरातील प्रलंबीत प्रश्नांच्या विरोधात आंदोलनाचा इशारा

शहरातील प्रलंबीत प्रश्नांच्या विरोधात आंदोलनाचा इशारा

परभणी : परभणी शहरातील रस्त्यामध्ये झालेले खड्डे आणि पावसाचे पाणी साचून नागरिकांना होणारे वेगवेगळे आजार याकडे महानगरपालिका आयुक्त जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे. यासाठी आयुक्त तृप्ती सांडभोर यांची हकालपट्टी करावी अशी मागणी भीमशक्ती संघटना परभणी जिल्ह्याच्या वतीने दि.२६ जुलै रोजी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

परभणी शहराच्या नागरी वस्ती मधून जाणारा जायकवाडी कालवा हा शहराच्या बाहेरून करण्यात यावा. तसेच गायरान धारक शेतक-यांना सातबारा देऊन या जमिनी त्यांच्या नावावर करण्यात याव्यात. गायरान जमिनीवरील पोट खराब हा शब्द काढण्यात यावा आणि परभणी शहरातील नागरिकांना सध्या घरकुल बांधण्यासाठी घरपट्टी महानगरपालिकेतर्फे दिली जात नाही ती तात्काळ देण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी भीमशक्ती संघटना परभणी जिल्ह्याच्या वतीने निवेदन देण्यात आले.

वरील मागण्या पूर्ण न झाल्यास दि. १२ ऑगस्ट रोजी भीमशक्ती संघटनेचे वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनास देण्यात आला आहे. या निवेदनावर संघटनेचे मराठवाडा महासचिव प्रा. डॉ. प्रवीण कनकुटे, जिल्हाध्यक्ष सतीश भिसे, दीपक कनकुटे, राहुल कनकुटे, विक्रम काळे, संजय वाहुळे, संघरत्न हातागळे, तातेराव वाकळे यांच्या स्वाक्षरी आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR