22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeलातूरशहरातील ७७ हजार घरांची कंटेनर तपासणी 

शहरातील ७७ हजार घरांची कंटेनर तपासणी 

लातूर : प्रतिनिधी
मान्सुन पुर्व तयारी म्हणून राष्ट्रीय डेंग्यु दिवस दि. १६ मे आणि डेंग्यु ताप प्रतिबंधात्मक उपाययोजनाच्या अनुषंगाने लातूर शहर महानगरपालिकेमार्फत दि. १४ ते २४  मे या कालावधी मध्ये  संपूर्ण शहरात अबेट मोहीमेचा पहिला राउंड राबविण्यात येत आहे. शहरातील एकूण अपेक्षीत घरसंख्या ७७ हजार ५९७ आहे. या सर्व घरामध्ये कंटेनर तपासणी करुन डास अळी आढळून आलेल्या कंटेनर मध्ये अ‍ॅबेट टाकण्यात येणार आहे व आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे.
डेंग्यु हा आजार एडिस एजिप्ताय या डासाच्या मादीच्या चावण्यामुळे होते, या डासाची उत्पती  रांजण, हौद, पाण्याच्या  टाक्या, कुलर्स, कारंजे, फलदाण्या इ. ठिकाणच्या स्वच्छ पाण्यात होते. घराभोवतालच्यां परिसरात अडगळीच्या  वस्तुमध्ये विशेषत: जुन्या  टायर्समध्ये साठवलेल्या  पाण्यात हे डास वाढतात. डेंग्यु आजार टाळण्याकरीता आठवड्यातून एक­ दिवस पाण्याचा साठा असलेल्या सर्व भांडी रिकामी करुन घासून-पुसून कोरडी करा, घरातील सर्व पाणी साठे झाकून ठेवा, झाकण नसल्यास कापडाने झाका. डासांपासून संरक्षणासाठी घराच्या खिडक्यांना जाळ्या बसवा व झोपताना मच्छरदाणीचा वापर करा, तापात अ‍ॅस्पिरीन किंवा ब्रुफेन अशी औषधे घेणे टाळा ती धोकादायक ठरु शकतात, ताप येताच प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र अंतर्गत वैद्यकीय अधिकारी यांचा सल्लात घ्यावा कोणताही ताप अंगावर काढू नका.
आठवड्यातून एकदा हे नक्की करा, घराभोवती ज्यामध्ये पावसाचे पाणी साचू शकेल अशा निरुपयोगी वस्तू  ठेवू नये, त्या नष्ट कराव्यात. कुलदाणी, कुंडी मनीप्लान्ट  इत्यादीतील पाणी नियमित बदलावे. परिसरातील डबकी वाहती करावी, नाले स्वच्छ­ करावेत, ड्रम किंवा इतर पाण्याची भांडी पुर्णपणे रिकामी करावीत.  स्वच्छ­ धुतल्या नंतर भरुन झाकण लावावे. तरी या मोहिमेत एकूण ८ नागरी आरोग्य. केंद्रातील कर्मचारी (एएनएम,आशा) यांचे मार्फत  राबविण्यात येत आहे. तरी अ‍ॅबेट मोहिमेत घर भेटीस येणा-या आरोग्या कर्मचा-यास सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. शंकर र. भारती वैद्यकीय आरोग्य अधिकारी, सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा लातूर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR