28.9 C
Latur
Tuesday, April 1, 2025
Homeलातूरशहरात घरी प्रसूती होण्याचे प्रमाण शून्य

शहरात घरी प्रसूती होण्याचे प्रमाण शून्य

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिका अंतर्गत ८ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र कार्यान्वित आहेत. या आरोग्य केंद्रामार्फत एप्रिल २०२४ ते फेब्रुवारी २०२५ पर्यंत एकुण ५९२७७ रुग्णांना रुग्णसेवा देण्यात आली आहे. या केंद्रांच्या माध्यमातून जननी सुरक्षा योजना राबवण्यात येते. शायकीय अथवा खाजगी रुग्णालयामध्ये प्रसूत महिलांना यामाध्यमातून आर्थिक मावेजा दिला जातो. सन २०२४-२०२५ मध्ये एकुण ७९२ महिलांना याचा लाभ देण्यात आला आहे. यामुळे शहरात घरी प्रसूती होण्याचे प्रमाण शुन्यावर आले आहे.
केंद्र शासन पुरस्कृत १५ वा वित्त आयोग अंतर्गत या वर्षात शहरातील एकुण २३ ठिकाणी आयुष्यमान आरोग्य मंदीर कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. हे केंद्र चालू झाल्यामुळे संबंधीत परिसरातील नागरीकांना त्यांच्या घराजवळ मोफत प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या केंद्राच्या माध्यमातून योग्य त्या उपाययोजना राबविल्या जात आहेत.  एकुण २३ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्रामार्फत एप्रिल २०२४ ते फेबु्रवारी २०२५ पर्यंत एकुण ९०८८६ रुग्णांना बा रुग्ण सेवा देण्यात आलेली आहे.  मिशन साद या कार्यक्रमांतर्गत लातूर शहरातील ० ते १ वर्ष वयोगटातील सर्व बालकांची उमंग एयुटीआयएसएम. जिल्हाधिकारी कार्यालय व लातूर शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कर्णबधीरता तपसाणी करण्यात आली. याचे उद्घाटन जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर-घुगे, आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्या हस्ते करण्यात आले. आरोग्य विभाग लातूर शहर महानगरपालिका सक्रीयरित्या सहभाग नोंदवून उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहे.
विद्यमान आर्थिक वर्षात लातूर शहर महानगरपालिकेतील प्राथमिक  नागरी आरोग्य केंद्र तावरजा कॉलनी, प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र गौतमनगर येथील नेत्र तपासणी युनिट कार्यान्वीत करण्यात येणार आहे. याचा लाभ परिसरातील सर्व गरजू नागरिकांना होणार आहे. शहरातील प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र गौतमनगर व मनपा दवाखाना काळेगल्ली या दोन ठिकाणी दंत चिकित्सा केंद्र कार्यान्वीत करण्यात आलेले आहे. सदर ठिकाणी सर्व सुविधा कार्यान्वीत करण्यासाठी येणा-या आर्थिक वर्षामध्ये योग्य ती पुर्तता करुन हे केंद्र सर्व गरजू रुग्णांसाठी उपलब्ध करुन दिले जाणार आहे. ऑगस्ट २०२४ पासून कार्यरत केंद्रामार्फत ६१९ रुग्णांना दंतसेवा देण्यात आली. मुखाचा कर्करोग तपासणी शिबिर आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR