22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeमहाराष्ट्रशांतिगिरी महाराजांवर गुन्हा दाखल

शांतिगिरी महाराजांवर गुन्हा दाखल

नाशिक : नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी सोमवारी त्र्यंबकेश्वर येथील मतदान केंद्रावर मतदान केले.यावेळी त्यांनी मतदान यंत्रालाच हार घातला. तसेच यंत्राला नमस्कार करून मंत्रही म्हटले.आता महाराजांवर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, देशासह महाराष्ट्रातही लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी सोमवारी (ता. २० )मतदान झाले. यात देशात ४९ मतदारसंघासह राज्यातील नाशिक, दिंंडोरी, मुंबईतील ६ अशा एकूण अकरा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यातच नाशिक लोकसभा निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवणार्या शांतिगिरी महाराजांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
नाशिक मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज विविध कारणांनी चर्चेत आहेत. सोमवारी त्यांनी तसेच त्यांच्या अनुयायांनी निवडणूक नियमांचा भंग केला. सोमवारी सकाळी अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी आपले पंचवीस ते तीन सहका-यांसह मतदान केंद्र क्रमांक २०५ येथे जाऊन मतदान केले.

यावेळी त्यांनी विनापरवाना मतदान केंद्रामध्ये मोबाईल नेला होता. सबंध मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण केले. मतदानानंतर मतपेटीला हार घातला. त्यामुळे निवडणूक कर्मचारी आणि केंद्र अध्यक्षांची चांगलीच धावपळ उडाली. त्यांनी शांतिगिरी यांना परावर्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र अन्य कशाचाही विचार न करता शांतिगिरी यांनी मतदान यंत्राला हार टाकला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. याबाबतची माहिती मिळाल्याने तहसीलदारांच्या सूचनेवरून र्त्यंबकेश्वर पोलिसांनी शांतिगिरी महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अंबड पोलीस ठाण्याच्या अधिका-यांकडे याबाबतची माहिती मिळाल्यावर त्यांनी संबंधित कार्यकर्त्यांची चौकशी केली. मतदानाच्या दिवशी अशा प्रकारे प्रचार करणे आणि उमेदवाराचे चिन्ह लावून फिरणे हा नियमांचा भंग आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR