22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeलातूरशालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या समावेशाला विरोध 

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या समावेशाला विरोध 

लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद, पुणे शालेय अभ्यासक्रम आराखड्यात मनुस्मृतीच्या समावेशाचा तीव्र शब्दांत निषेध  करुन त्याबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी अधिकारी कल्याण महासंघाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्यामार्फत देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणेमार्फत शालेय अभ्यासक्रम आराखड्याच्या मसुद्याबाबत दि. २३ मे ते ३ जूनपर्यंत नागरिकांना आक्षेप, हरकती व अभिप्राय नोंदविण्यास सांगितले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेच्या अभ्यासक्रम आराखड्यातील (शालेय शिक्षण २०२४) दुस-या  विभागात मूल्य आणि स्वभाववृत्ती या पाठाची सुरुवात मनुस्मृतीच्या श्लोकाने केली आहे, यावर संघटनेने आक्षेप घेत तीव्र निषेध नोंदविला आहे.
भारतीय संविधानाच्या विरोधात जाणीवपूर्वक राबविण्यात येणारा हा रचनात्मक कार्यक्रम असून भारतीय समाजात विषमतेची बीजे पुन्हा पेरुन जातीव्यवस्था अधिक बळकट करण्याचा निंदनीय प्रकार यामधून दिसून येतो. निवेदनावर राज्य अतिरिक्त महासचिव यू. डी. गायकवाड, जी. टी. होसूरकर, संजय डावळे, जिल्हाध्यक्ष नागसेन कांबळे, किशोर गायकवाड, शांतीलाल लांडगे, बळीराम गायकवाड, अरंिवद भोसले, विद्यासागर काळे, बळीराम भोगे, प्रवीण सूर्यवंशी, रवी कुरील, माधव कांबळे, सचिन कांबळे, रविकांत सिरसाट, रिकेत भोसले आदींच्या स्वाक्ष-या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR