21.3 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeलातूरशालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावे

शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावे

लातूर : प्रतिनिधी
आर्थिक साक्षरतेसाठी शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाचे धडे मिळावेत, असे मत जिल्हा बँकेच्या टिळकनगर शाखेतील कनिष्ठ बँक अधिकारी उषा सारोळे यांनी व्यक्त केले. ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानांतर्गत राजमाता जिजामाता विद्यालयात ‘विद्यार्थ्यांमध्ये पैशाचा योग्य विनियोग, बचत बँक’ या विषयावर सारोळे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव प्राचार्य डी. एन. केंद्रे होते. प्रमुख पाहुण्या म्हणून संस्थेच्या अध्यक्षा के. ए. जायेभाये, प्राचार्य संगमेश्­वर  केंद्रे, संस्था सदस्य प्रा. कविता केंद्रे, मुख्याध्यापिका स्वाती केंद्रे व बँकेतील कर्मचारी मृणाल रट्टे मंचावर उपस्थित होते.
पैशाचे नियोजन करून गुंतवणूक करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन करून यावेळी सारोळे यांनी, बँकेचे व्यवहार, कर्ज, व्याज प्रणाली, आर्थिक व्यवहारासाठी ‘युपीआय’सारख्या आधुनिक साधनाचा वापर करताना घ्यावयाची काळजी, इन्स्टंट मोबाइल पेमेंट, फोन पे, गुगल पे, पेटीएम, भीम अ‍ॅपबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य डी. एन. केंद्रे म्हणाले की, राजमाता जिजामाता विद्यालयात बचत बँक स्थापन करणार असून पैशाचा योग्य विनियोग व व्यवस्थापन यात विद्यार्थ्यांचा सहभाग घेण्यात येणार आहे. या विभागाचे प्रमुख म्हणून पाडूरंग कुलकर्णी यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी रट्टे यांनी, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी बँकेत खाते काढावे, असे आवाहन केले. सूत्रसंचालन सुनीता जवळे यांनी केले. तर आभार ए. बी. मुंढे यांनी मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR