22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeनांदेडशासनाच्या निषेधार्थ कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा एल्गार

शासनाच्या निषेधार्थ कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा एल्गार

शिक्षक दिन ‘अन्याय दिन’ म्हणून केला साजरा

कंधार : प्रतिनिधी

आपल्या प्रलंबित मागण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी मागण्याची पूर्तता होत नसल्याने गुरुवारी शिक्षक दिनावर बहिष्कार टाकला. या वेळी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्यावतीने तहसीलदारांच्या माध्यमातून शिक्षणमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्या सोडविल्या जात नसल्याने व त्याबाबत वारंवार आश्वासन देऊनही शासन आश्र्वासित मागण्यांवर निर्णयाची अंमलबजावणी करीत नसल्याने राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने गुरुवारी राज्यभर शिक्षक दिनावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने कंधार मध्ये गुरुवारी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी शिक्षक दिनावर बहिष्कार टाकून शिक्षक ‘अन्याय दिन’ साजरा केला.

मागच्यावर्षी प्रलंबित मागण्या पैकी काही मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन सरकारने दिले होते. त्यामुळे बारावीच्या उत्तर पत्रिका तपासणी वरील बहिष्कार महासंघाने मागे घेतला होता. त्यानंतर मान्य मग्ण्यामधील १२९८ वाढीव पदांना मान्यता देण्याऐवजी सदर पदावर कार्यरत २८३ शिक्षकांच्या समावेशनाचा आदेश काढण्यात आला. व राज्यात काही शिक्षकांचे समायोजन करण्यात आले. परंतू अनेकांचे समायोजन रखडले. अनेक शिक्षकांना त्यांच्या जिल्ह्यात व विभागात रिक्त जागा असूनही त्यांच्या समयोजनेचे अधिकार संबंधित उपसंचालकांना देण्याचे कबूल करूनही त्याबाबतचे आदेश निघालेले नाहीत.

अशी अनेक प्रकरणे आश्वासन देऊन निकाली काढली गेली नसल्याने शिक्षकांच्या मनात असंतोष निर्माण झाला असून शिक्षक दिनावर बहिष्कार टाकून शिक्षक दिन अन्याय दिन म्हणून साजरा केला. यावेळी महासंघाच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी महासंघाचे सचिव प्रा. सुहास कलमे, उपाध्यक्ष प्रा. सुभाष वाघमारे, प्रा. सय्यद जीलानी, प्रा. एस. पी. शेट्टीवार, प्रा. गजेंद्र किडे आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR