22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeलातूरशिंदाळावाडी येथे एकाचा खून, तिघे गंभीर

शिंदाळावाडी येथे एकाचा खून, तिघे गंभीर

औसा : प्रतिनिधी
शिंदाळावाडी, (ता.औसा) येथील शिवारातील शेताच्या सामाईक बांधावरील माती नेण्याचे कारणावरून गुरूवारी सायंकाळी ८ ते १० जणांच्या समुहाने कत्ती, काठ्या, दगड, लाथा- बुक्क्यांनी मारहाण करून एका शेतक-याचा खून केल्याची घटना घडली आहे.  या घटनेत अन्य गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी प्रमुख पाच व इतरांविरूद्ध भादा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात  आला यातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक करण्यात केली आहे.
शिंदाळावाडी, (ता.औसा) येथे गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास शिंदाळवाडी शिवारातील शेतामध्ये असलेल्या बांधावरील माती जेसीबी व ट्रॅक्टरने नेण्याच्या कारणावरून काही जणांच्या समुहाने काठ्या, लाठ्या, रॉड, कत्ती, दगडांचा मारा करून विलास व्यंकट मोरे (वय ४५) रा. शिंदाळवाडी याचा खून केला. तर इतर अनेकांना जखमी करण्यात आले आहे.
चंद्रसेन किसन मुळे, अण्णाराव किसन मुळे, शेषेराव किसन मुळे, कमलाकर शेषेराव मुळे, परमेश्वर शेषेराव मुळे, जेसीबी चालक संतोष माने, अंगद त्र्यंबक भोसले व त्यांच्या सोबतचे इतर सर्व रा. शिंदाळवाडी यांनी या शेत शिवारामध्ये  काठ्या, कत्ती, दगड याचा मारा करून विलास व्यंकट मोरे यांचा  खून केला तर दरम्यान इतर  तीन ते चार जणांना जखमी करण्यात आले.  या प्रकरणी रोहीत विलास मोरे याच्या फिर्यादीवरून वरील ७ जण व इतरांच्या विरोधात भादा पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी, संबंधीत पोलीस ठाण्याचे प्रभारी यांनी घटनास्थळास भेट दिली आहे. उपलब्ध माहितीनुसार या प्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. किरकोळ कारणावरून काठ्या, रॉड, दगड, कत्तीने मारहाण करून शिंदाळवाडी शिवारात खून करण्यात आल्या प्रकरणी या परिसरात चर्चा सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR