22.8 C
Latur
Saturday, December 21, 2024
Homeमहाराष्ट्रशिंदे गटाकडून महिलांना बुरखा वाटप

शिंदे गटाकडून महिलांना बुरखा वाटप

मुंबई : प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी विरोधक आणि सत्ताधा-यांकडून विविध आश्वासने दिली जात आहेत. अशातच आता शिवसेना शिंदे गटाकडून मुस्लिम महिलांना बुरखा वाटप करण्यात आले आहे. शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांच्याकडून हे बुरखा वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे आता शिंदे गट लोकसभेतील आपली चूक सुधारण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत मुस्लिमांची मते मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे गटाकडून मुस्लिम महिलांना बुरखा वाटप केल्याचे आता दिसत आहे. या संदर्भातील एक बॅनर भायखळा येथे लावण्यात आले होते. जे सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

बुरखा वाटप कार्यक्रमामुळे स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवणा-या शिंदेसेनेला अचानक मुस्लिमांची आठवण कशी झाली? असा सवालही विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आता या बुरखा वाटपावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे.
भायखळा येथे लावण्यात आलेल्या बॅनरवर या मतदारसंघात प्रथमच मुस्लिम महिलांना बुरखा वाटप करण्यात येणार असल्याचे लिहिले आहे. आमदार यामिनी जाधव यांच्या वतीने हे बॅनर लावण्यात आले आहे. तर यावर धर्माच्या आधारे संधिसाधू राजकारण करत असल्याचा आरोपही विरोधक करत आहेत.

महत्त्वाची बाब म्हणजे मुंबईतील भायखळा विधानसभा मतदारसंघ हा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात येतो. याच मतदारसंघात लोकसभेला ठाकरे गटाचे अरविंद सावंत विजयी झाले आहेत. त्यांना भायखळामधून मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याकांची मते मिळाली आहेत. त्यामुळे लोकसभेला मुस्लिम समाजाने आपणाला डावलले त्याप्रमाणेच आता विधानसभेलाही हा समाज आपल्यापासून लांब जायला नको यासाठी शिंदे
गटाकडून मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी बुरख्यांचे वाटप केल्याचे पाहायला मिळत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR