22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeलातूरशिक्षकांची जिल्हाअंतर्गत विनंती बदली करा

शिक्षकांची जिल्हाअंतर्गत विनंती बदली करा

लातूर : प्रतिनिधी
शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद शिक्षकांची जिल्हाअंतर्गत विनंती बदली करा, अशी मागणी कास्ट्राईब महासंघाची मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिका-यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.  महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी अधिकारी कल्याण महासंघाच्या एका निवेदनाद्वारे शासन परिपत्रक शालेय शिक्षण विभाग दि. २१ जून २०२३ चा निर्देशानुसार व ग्राम विकास विभाग मंत्रालय मुंबई यांच्या दि. ११ मार्च रोजीच्या पत्रानुसार जिल्हा परिषदेमधील शिक्षकांच्या बदली समुपदेशनाने नवीन भरतीच्या अगोदर करावे असे म्हटले आहे. त्या अनुषंगाने लातूर जिल्ह्यातील नवीन शिक्षकांची भरती केली असली तरी शिक्षकांच्या विनंती बदल्या शासनाच्या निर्देशानुसार कराव्यात अन्यायग्रस्त शिक्षकाला न्याय मिळवून द्यावा असे महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी अधिकारी कल्याण महासंघाने शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद लातूर यांना मागणी केली आहे.
निवेदनावर जी. टी. होसुरकर विभागीय अध्यक्ष, य.ु  डी. गायकवाड, नागसेन कांबळे जिल्हाध्यक्ष, मार्गदर्शक दिलीप जाधव, किशोर गायकवाड जिल्हा सचिव, प्रवीण सूर्यवंशी जिल्हा अतिरिक्त्त महासचिव, अरविंद भोसले जिल्हा संघटन सचिव, जिल्हा कार्याध्यक्ष अण्णा नरंिसगे, बळीराम गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष, विद्यासागर काळे जिल्हा कोषाध्यक्ष, रवी कुरील औसा तालुकाध्यक्ष, नवनाथ वाघमारे रेनापुर तालुका सचिव, यशवंत माने सदस्य, जाणते व्हि.  एच. इत्यादीं उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR