31.7 C
Latur
Saturday, April 5, 2025
Homeमहाराष्ट्रशिर्डीत पुन्हा एकदा दुहेरी हत्याकांड

शिर्डीत पुन्हा एकदा दुहेरी हत्याकांड

अहिल्यानगर- शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मागील बाजूस असलेल्या काकडी शिवारात आज पहाटेच्या सुमारास घडलेल्या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी भोसले यांच्या वस्तीवर हल्ला करीत कृष्णा साहेबराव भोसले (वय ३५) आणि त्यांचे वडील साहेबराव भोसले यांची निर्घृण हत्या केली आहे. या हल्ल्यात साखराबाई भोसले गंभीर जखमी असून, त्यांच्यावर प्रवरा ग्रामीण रुग्णालय लोणी येथे उपचार सुरू आहेत.

घरी जाऊन पाहणी केल्यावर ही धक्कादायक घटना उघडकीस आली. हल्लेखोरांनी घरात प्रवेश करत अचानकच हल्ला केला. या घटनेत गाईजाबाई या वृद्ध महिला बचावल्या असून, त्यांना ऐकू येत नाही आणि दिसत नसल्यामुळे हल्लेखोरांच्या लक्षात आल्या नाहीत, अशी माहिती मिळत आहे.

घटनेची माहिती सकाळी डेअरी चालकाला शंका आल्यानंतर समोर आली. सकाळी नेहमीप्रमाणे दूध घेण्यासाठी कोणीच न आल्याने डेअरी चालकाने शेजारील शेतक-यांशी संपर्क साधला. त्या शेतक-याने भोसले यांच्या घरी जाऊन पाहणी केल्यावर ही धक्कादायक घटना उघडकीस आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR