20.9 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeमहाराष्ट्रशिवरायांच्या विचारातूनच संविधाननिर्मिती

शिवरायांच्या विचारातूनच संविधाननिर्मिती

राहुल गांधींनी केले छत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण

कोल्हापूर : प्रतिनिधी
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी आज कोल्हापूर दौ-यावर आहेत. या दौ-यादरम्यान कसबा बावडा येथील भगवा चौकात त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले.

यावेळी राहुल गांधी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांची ही फक्त एक मूर्ती नाहीये, तेव्हा मूर्ती तयार केली जाते, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या विचारधारेला, त्यांच्या कर्मांना मनापासून स्वीकारतो. कोणी मूर्तीचे अनावरण केले आणि जीवनभर ते ज्या गोष्टींसाठी लढले त्यांच्यासाठी आपण लढलो नाही तर मूर्तीचा काही अर्थ उरत नाही. जेव्हा आपण या मूर्तीचे अनावरण करतो, तेव्हा आपण हे वचन देखील घेतो की ज्या पद्धतीने ते जगले, त्यांच्याइतके नाही पण थोडेफार तरी आपण देखील केले पाहिजे.

ते पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी देश आणि जगाला काय संदेश दिला? त्यांच्या विचारांचे आज कोणते चिन्ह अस्तित्वात आहे तर हे संविधान आहे. थेट कनेक्शन आहे. जे शिवाजी महाराजांनी सांगितले, २१ व्या शतकातील त्याचे भाषांतर हे संविधान आहे. यामध्ये तुम्हाला अशी एकही गोष्ट आढळणार नाही ज्यासाठी ते लढले नाहीत. संपूर्ण आयुष्यभर ते लढले, त्यांनी जी काही कामे केली, त्याच विचारातून हे संविधान जन्माला आले. दुस-या पद्धतीने सांगायचे झाल्यास छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराजांसारखे लोक नसते तर हे (संविधान) अस्तित्वात नसते.’ असेही राहुल गांधी म्हणाले.

दरम्यान लवकरच राज्यात विधानसभा निवडणूक लागणार आहे. अशात सर्व पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. राज्यभरात सर्व पक्षांच्या नेत्यांनी जाहीर सभा आणि बैठका सुरू करत रणनीती आखायला सुरुवात केली आहे. अशात राहुल गांधींचा कोल्हापूर दौरा येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा मानला जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR