19.4 C
Latur
Thursday, December 12, 2024
Homeपरभणीशिवसेना नेते आनंद भरोसे यांचा नुकसानग्रस्त व्यापा-यांना मदतीचा हात

शिवसेना नेते आनंद भरोसे यांचा नुकसानग्रस्त व्यापा-यांना मदतीचा हात

परभणी : परभणी शहरात दि.११ डिसेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये शहरातील व्यापा-यांच्या दुकानांची तोडफोड करण्यात आली होती. दि.१० डिसेंबर रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आल्याच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला तसेच पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये व्यापा-यांकडून संपूर्ण बाजारपेठही बंद होती. काही समाजकंटकांनी बंद दरम्यान बाजारपेठेतील दुकाने फोडण्याचे काम केले. बंद दरम्यान व्यापा-यांच्या प्रतिष्ठानांचे मोठे नुकसान करण्यात आले. तसेच विद्युत मिटर, सीसीटीव्ही, दुकानावरील फलक यांचीही तोडफोड करण्यात आली. या नुकसानग्रस्ताना शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंद भरोसे यांच्या वतीने नुकसानग्रस्त व्यापा-यांना आर्थिक मदत करण्यात आली. तसेच नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त व्यापा-यांना मावेजा द्यावा अशी मागणी शिवसेना नेते भरोसे यांनी प्रशासनाकडे केली आहे.

परभणी शहरात बुधवारी पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान व्यापा-यांची दुकाने मोठ्या प्रमाणात फोडण्यात आली. तसेच जाळपोळ करीत मोठे नुकसान करण्यात आले. या नुकसानग्रस्त दुकानाची पाहणी गुरूवार, दि.१२ रोजी शिवसेना नेते भरोसे यांनी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त व्यापा-यांची भेट घेवून त्यांना आर्थिक मदतीचा हात दिला. तसेच व्यापारी पेठातील दगडफेकीसह जाळपोळीच्या घटनांमुळे मोठ्या प्रमाणावर झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत व संबंधित व्यापा-यांना प्रशासनाने त्वरीत मावेजा वितरित करावा अशी मागणी प्रशासनाकडे केली. शिवसेना नेते भरोसे यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल व्यापा-यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR