17.6 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeमहाराष्ट्रशिवसेनेच्या भोंडेकरांचा सर्व पदांचा राजीनामा

शिवसेनेच्या भोंडेकरांचा सर्व पदांचा राजीनामा

उपनेतेपद, विदर्भ समन्वयकपद सोडले
भंडारा/ नागपूर : मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेल्या भंडारा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार भोंडेकरांनी शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. नरेंद्र भोंडेकर यांनी त्यांच्याकडे असलेल्या उपनेतेपदाचा आणि पूर्व विदर्भ समन्वयकपदाचा राजीनामा दिला. भोंडेकर यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही. एकनाथ शिंदे भोंडेकरांच्या निर्णयावर काय भूमिका घेतात हे पाहावे लागेल.

शिवेसना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मंत्रिपद न मिळाल्याने नाराज होत शिवसेनेच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला. निवडणुकीच्या तोंडावर भोंडेकर यांनी निवडणूक अपक्ष लढण्याची तयारी दर्शविली होती. त्यानंतर त्यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती केली होती. निवडणुकीदरम्यान एकनाथ शिंदे यांनी भोंडेकर यांना मंत्रिपद देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आता मंत्री मंडळात त्यांना स्थान न मिळाल्याने भोंडेकर यांनी त्यांच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेनेने त्यांना मंत्री न केल्यामुळे पक्षाच्या विविध पदांचा राजीनामा दिला. पक्षाचे पूर्व विदर्भ समन्वयक हे पदही सोडले. सोबतच शिवसेनेच्या उपनेतेपदाचा राजीनामाही त्यांनी दिला.

तानाजी सावंतही नाराज
शिवसेना शिंदे गटाचे परांडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली नसल्याने ते नाराज आहेत. मंत्रिपद मिळाले नसल्याने तानाजी सावंत हे नागपूरच्या रेडिसन्स ब्लू हॉटेलमधून बॅग पॅक करुन निघून गेले. ते आज राजभवनावर फिरकलेच नाहीत. त्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे.

रामदास आठवले यांची नाराजी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ला मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळाले नाही. त्यामुळे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली. आम्हाला एमएलसी आणि मंत्रिपद देण्याचे आश्वासन दिले. परंतु त्याची पूर्तता झाली नाही, असे ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR