27.3 C
Latur
Tuesday, April 1, 2025
Homeमहाराष्ट्रशिस्तीत रहा बेट्या, मी अंगार,भंगार नायरे

शिस्तीत रहा बेट्या, मी अंगार,भंगार नायरे

मशिदीमध्ये स्फोट करण्यापूर्वी आरोपीने बनवली रील

बीड : प्रतिनिधी
बीडच्या गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावात असलेल्या मशिदीमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली. गावातील दोन युवकांनीच मशिदीमध्ये जिलेटीनच्या माध्यमातून स्फोट घडवून आणला होता. पोलिसांनी स्फोट केल्या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. यातील एक आरोपी विजय गव्हाणे याने स्फोट घडवण्याआधी इन्स्टाग्रामवर रील बनवली होती. दरम्यान या स्फोट प्रकरणी पोलिसांनी श्रीराम सागडे नावाच्या व्यक्तीलाही ताब्यात घेतले आहे.

गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावातील दोन युवकांनीच मशिदीमध्ये स्फोट घडवून आणला. या प्रकरणाची गंभीर दखल पोलिसांनी घेत दोन आरोपींना तात्काळ अटक केली. वादातून या दोन आरोपींनी स्फोट घडवून आणला. अर्धमसला गावात मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास गावातील दोन युवकांनी मशिदीमध्ये जिलेटीनच्या माध्यमातून स्फोट घडवला.

या घटनेने जिल्हाभरात खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षकांनी पहाटेच घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. स्फोट करण्याआधी गव्हाणेने इन्स्टाग्रामवर ‘शिस्तीत रहा बेट्या, मी अंगार, भंगार नाय रं’ असे बोल असलेल्या गाण्याची रील बनवली. या रीलमध्ये त्याने एका हातात जिलेटीन घेतले आहे. तर दुस-या हातात पेटवलेली सिगारेट दिसत आहे.

विशेष पोलिस महानिरीक्षक संभाजीनगर परिक्षेत्राचे वीरेंद्र मिश्रा यांनी देखील घटनास्थळाची पाहणी केली. तलवाडा पोलिस ठाण्यात २ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर बॉम्ब शोधक पथक आणि फॉरेन्सिक पथकाने या ठिकाणी तपासणी केली. पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे, तर पोलिसांनी शांततेचे आवाहन केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR