26.1 C
Latur
Tuesday, July 2, 2024
Homeलातूरशेंदच्या आधुनिक भगीरथाने भागवली ग्रामस्थांची तहान

शेंदच्या आधुनिक भगीरथाने भागवली ग्रामस्थांची तहान

शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
तालुक्यातील शेंद उत्तर येथे पाण्याची तीव्र पाणी टंचाई पाहता गावचे सरपंच प्रतिनिधी देवा माने यांनी स्वखर्चाने ंिवधन विहीर घेऊन त्यात मोटार सोडून ग्रामस्थांची तहान भागवत गावचे पालकत्व जपण्याचे काम केले असून त्यांच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांतून कौतुक केले जात आहे.
    भगीरथ राजाने स्वर्गातून गंगा नदी पृथ्वीवर आणल्याचा उल्लेख पौराणिक कथांमध्ये आहे, असेच एक आधुनिक भगीरथ तालुक्यातील शेंद उत्तरमध्ये आहेत. त्यांनी आपल्या गावातील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी स्वखर्चाने ंिवधन विहीर घेऊन ग्रामस्थांची तहान भागवली. इतकेच काय तर त्यांनी स्वत: गावातील पाणी पुरवठ्याकडे लक्ष देत दातृत्वाचे उत्तम उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे. दरम्यान स्वत:च्या शेतातील ंिवंधन विहीरीचे पाणी विनामूल्य गावक-यांसाठी सोडण्यात आले. पण अचानक या वर्षात बोअर बंद पडल्यामुळे गेली आठ दिवसापासून ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती सुरू होती.अशात पाण्याची तीव्र टंचाई पाहता सरपंच वैशाली माने यांचे पती देवा माने यांनी स्वखर्चाने गावात ंिवधन विहीर घेतली व त्याला चांगले पाणी लागल्याने ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे.
   सदरील ंिवधन विहीरीचे पाणी गावातील नारायण माने, ंिलबराज भालके, अनिल माने, दगडू सुरवसे, बाबासाहेब माने, पंडित दाजी, शरद पाटील, पंडित माने, अविनाश माने, ज्ञानोबा सुरवसे, ज्ञानोबा माने, विनायक बिरादार, मनोज माने उपस्थितीत देवा माने यांनी खुले करून दिले. त्यांच्या या दातृत्वाबद्दल ग्रामस्थांतून समाधान व्यक्त केले जात आहे

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR