21.5 C
Latur
Sunday, January 5, 2025
Homeराष्ट्रीयशेअर बाजारात अमेरिकेची दहशत, ३ तासांत ३.१७ लाख कोटी बुडाले!

शेअर बाजारात अमेरिकेची दहशत, ३ तासांत ३.१७ लाख कोटी बुडाले!

गुंतवणूकदारांचे दिवाळे निघाले

 

मुंबई : वृत्तसंस्था
शेअर बाजारात अमेरिकेतील संकटाची दहशत पाहायला मिळत आहे. याला काही कारणे देखील आहेत. आधी अमेरिकेतील डॉलरच्या मजबूतीने रुपयांत लागोपाठ घसरण पाहायला मिळाली. ज्याचा परिणाम शेअर बाजारावर झाल्याचे पाहायला मिळाले. दुसरे प्रमुख कारण अमेरिकेत फेड रिझर्व्हची बैठक आज रात्री होणार आहे त्यातील निकालाची भीती शेअर बाजारात पहायला मिळाली. कारभार होण्याच्या काळात सेन्सेक्समध्ये १००० हून अधिक अंकानी घसरण पहायला मिळाली. दुसरीकडे गुंतवणूकदारांचे ३.१७ लाख कोटी बुडाले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली.

फेड बैठकी आधीची दहशत : अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेच्या धोरणात्मक बैठकी आधी गुंतवणूकदार सावध झाले आहेत. या बैठकीत सेंट्रल बँकांच्या व्याज दरात कपात होण्याची आशा आहे. ‘सीमई’ फेडवॉच टूल’ बुधवारी २५ बेसिस-पॉइंट दर कपातीची ९७ टक्के शक्यता दर्शवित आहे.

चीनची इकॉनॉमी कमजोर : सोमवारी जारी झालेल्या आकडेवारीवरुन समजले की, नोव्हेंबरात चीनची विक्री अपेक्षेपेक्षा धिमी झाली आहे. किरकोळ विक्रीत केवळ तीन टक्के वाढ झाली आहे. जी ऑक्टोबर ४.८% च्या वाढीपेक्षा कमी आहे. तर औद्योगिक उत्पादनात ऑक्टोबरप्रमाणे साल दर साल ५.४ टक्के वाढ झाली. ही जागतिक कमोडीटी मागणीला प्रभावित करु शकते. ज्यामुळे भारतात धातू, ऊर्जा आणि ऑटो सेक्टरसाठी जोखीम निर्माण होऊ शकते, जी चीनच्या आर्थिक आकड्यांवरुन संवेदनशील आहे. आजच्या कामकाजात निफ्टी धातू आणि ऑटो सेक्टरमध्ये ०.६% टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे.

गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान
शेअर बाजारात झालेल्या घसरणीने गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. एक दिवस आधी सेन्सेक्सचा मार्केट कॅप ४,६०,०६,५५७.३० कोटी रुपये होते. जे मंगळवारी सेन्सेक्स १००० अंकांहून अधिकची घसरण झाल्याने ४,५६,८९,३२२.४१ कोटी रुपयांवर आला आहे. ज्यामुळे बीएसईच्या मार्केट कॅपला ३,१७,२३४.८९ कोटीची नुकसान झाले. तज्ज्ञांच्या मते शेअर बाजारात गुंतवणूक करणा-यांना आणखी नुकसान होण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR