22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeपरभणीशेक हॅण्डकडून २०० गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटप

शेक हॅण्डकडून २०० गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटप

परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील २०० निराधार, वडील नसलेल्या, गरजू विद्यार्थ्यांना शेक हॅण्ड फाउंडेशनने शैक्षणिक किटचे वाटप केले आहे. गरजू विद्यार्थ्यांचे शिक्षण बिकट परिस्थितीमुळे थांबू नये या उद्देशाने किटचे वाटप करण्यात आले. यातील साहित्य वर्गानुसार व गरजेनुसार वाटप करण्यात आले आहे.

या साहित्यात सिंगल, टू, फोरलाईन वही, रजिस्टर, कंपास, पेन, पेन्सिल, इरेझर, शापनर, स्केल, उजळनी, प्रायमर इत्यादी साहित्याचा समावेश होता. प्रत्येक विद्यार्थ्यास किटमध्ये स्कूल बॅग, ८ वह्या किंवा रजिस्टर, ५ पेन, ३ पेन्सिल, २ शापनर, २ इरेझर, स्केल, वर्गानुसार कंपास, उजळणी, प्रायमर देण्यात आले. ही किट शेक हॅण्डच्या सदस्यांच्या मदतीतून जमा करण्यात आल्या. किट तयार करण्यात नितीन तांदळे, राजू पांचाळ, पांडुरंग चव्हाण,चंद्रकांत भोसले, संतोष चव्हाण, शाम गाडेकर आदींनी मेहनत घेतली.

परभणी तालुक्यात टाकळी कु, असोला, रायपूर, शेंद्रा येथे ६३ किट, मानवत तालुक्यात मानवत व वांगी ८ किट, जिंतूर तालुक्यात अंबरवाडी, पिंपळगाव गायके, मालेगाव, मानधनी, मानमोडी, रेपा येथे १९ किट, पूर्णा तालुक्यात कातनेश्वर येथे ९ किट, औंढा तालुक्यात वडद, टाकळगव्हाण, पोटा, अंजनवाडा व नांदखेडा येथे २६ किट तर वसमत तालुक्यात लोन बु, गुंडा, कळंबा येथे ३३ किट अशा एकूण २०६ किटचे वाटप करण्यात आले. गटसाधन केंद्र सोनपेठ येथे झालेल्या कार्यक्रमात खडका व नरवाडी केंद्रातील ४८ विद्यार्थ्यांना किटचे वाटप करण्यात आले. यावेळी गटशिक्षणाधिकारी शौकत पठाण उपस्थित होते. तर प्रमुख उपस्थितीत केंद्रप्रमुख नारायण भोसले, संजय देशमुख, मुख्याध्यापक वाल्मीक लहाने, डेटा ऑपरेटर ओम परांडे, परमेश्वर सिराळ हे उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR