28.4 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeलातूरशेतकरी अंगद शिंदे यांच्या वारसांना ४ लाखांची मदत 

शेतकरी अंगद शिंदे यांच्या वारसांना ४ लाखांची मदत 

लातूर : प्रतिनिधी
लातूर तालुक्यातील बाभळगाव येथील शेतात काम करीत असताना शेतकरी अंगद अंबादास शिंदे यांचा ११ मे रोजी अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. शिंदे कुटुंबियांची परिस्थिती आणि अंगद शिंदे यांचा अकाली मृत्यू लक्षात घेता राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आणि बाभळगाव ग्रामपंचायतने केलेल्या पाठपूरावामुळे महसूल विभाग लातुर यांच्याकडून गुरुवार दि. २० जून रोजी मयत शेतकरी अंगद शिंदे यांच्या वारस असणा-या त्यांच्या पत्नी मंगलबाई शिंदे यांना ४ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे, तसा आर्थिक मदतीचा धनादेश लातूरचे तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी लातुर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, उपसरपंच गोविंद देशमुख, मंडळ अधिकारी सुनील लाडके, गोविंद जोशी, संतोष शिंदे यांची उपस्थिती होती. लातूर जिल्ह्यात पावसाळ्यात वीज पडून जीवितहानी होण्याच्या घटनात होणारी वाढ पाहता बाभळगाव येथे लायटनिंग अरेस्टेड टॉवर उभारण्यात यावे अशी मागणी बाभळगाव ग्रामपंचायतच्या वतीने एक ठराव घेऊन करण्यात आली असून याबाबतचे लेखी निवेदन देखील यावेळी लातुरचे तहसीलदार सौदागर तांदळे यांना उपसरपंच गोंिवद देशमुख यांनी दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR