रेणापूर : प्रतिनिधी
माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी (दि. १२) विजया दशमीच्या शुभ मुहुर्तावर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये शेतीमाल खरेदी-विक्रीचा (सौदा )शुभारंभ करण्यात आला.
रेणापूर येथील कृषि उत्पन्न बाजार समिती अस्तित्वात आल्यापासून या बाजार समिती विकसीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. परंतु लातूर बाजार पेठ जवळ असल्याने या प्रयत्नाला म्हणावे तसे यश मिळाले नाही. माजी मंत्री तथा सहकार महर्षी दिलीपराव देशमुख व माजी मंत्री आ. . अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व आ. धिरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीमध्ये रस्ते, लाईट, पाण्याच्या सुविधेसह इतर मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच तालुक्यातील शेतक-यांना रेणापूर येथे बाजार पेठ मिळावी व शेतीमालाला योग्य भाव मिळावी म्हणून आ. देशमुख हे सातत्याने प्रयत्नशील होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विजया दशमीच्या शुभ मुहुर्तावर शेतमाल खरेदी विक्री (सौदा) चा शुभारंभ करण्यात आला.
या शुभारंभ कार्यक्रमास रेणा सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन अनंतराव देशमुख, लातुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अॅड. प्रमोद जाधव, रेणुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन माणिकराव सोमवंशी, सहाय्यक निबंधक आर. जी. गडेकर कृउबाचे सभापती उमाकांत खलंग्रे, उपसभापती अॅड. शेषेराव हाके, संगायो समितीचे माजी अध्यक्ष गोविंद पाटील, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष तथा शहर उपाध्यक्ष उमेश सोमानी व संचालक जनार्धन माने, अॅड. शिरीष यादव नागनाथ कराड, प्रविण माने, प्रकाश सुर्यवंशी, अशोक राठोड, अॅड. मुरलीधर पडोळे, कमलाकर आकनगिरे, अमर वाकडे, बाळकृष्ण खटाळ, विश्वनाथ कागले यांच्यासह आदी व्यापारी व आडते उपस्थित होते.