23.8 C
Latur
Tuesday, March 11, 2025
Homeलातूरशेवगा १२० रुपये तर वांगी ८० रुपये किलो

शेवगा १२० रुपये तर वांगी ८० रुपये किलो

लातूर : प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून शहरातील बाजार समितीत भाजीपाल्याची आवक मंदावली आहे. परिणामी किरकोळ बाजारात दोडके, वागें, शेवगा, अद्रक, मिरचीसह अन्य भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना भाजीपाला आता परवडेनासा झाला आहे. वरणाच्या डाळीही महागल्याने सामान्यांवर चटणी-भाकरीची वेळ आल्याची परिस्थिती आहे. शेवगा १२० ते १४० रुपये तर वांगी ८० ते ९० रुपये किलो आहेत.

येथील महात्मा फुले कृषी उत्पन्न बाजार समितीत स्थानिक जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यातून शेती नियमित मालाची आवक होते. गेल्या काही दिवसांपासून या ठोक बाजारात भाजीपाल्याची आवक मंदावली असल्याने किरकोळ बाजारात मात्र भाव तेजीत असल्याचे चांगलेच परिणाम दिसून येत आहेत. गेल्या आठ दिवसाच्या तुलनेत अपवाद वगळता जवळपास सर्वच भाजीपाल्याचे दर वाढल्याचे पाहावला मिळत आहेत. शहरातील महात्मा फुले कृषी उत्पन्न बाजार समितीत पालेभाज्यांची आवक गेल्या महिन्याभरापासून घटल्याने स्थानीक किरकोळ बाजारात पालेभाज्यांच्या दरातही दुप्पटीने वाढ झाली आहे. नोव्हेंबरमध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे भाजीपाल्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे पालेभाज्यांचे उत्पादनही घटल्याचा परिणाम थेट भाववाढीत झाला आहे. यामुळे आता गृहिणींचे बजेट कोलमडत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत भेंडी, गवार, कारले, दोडके, कोबी, फ्लॉवर, वांगे, शेवगा, मेथी, पालक, कोंिथबीर यांची आवक काही प्रमाणात घटली आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंत बाजारात भाजीपाल्याची आवक मोठया प्रमाणात होती.

नोव्हेंबरमध्ये अवकाळी पाऊस झाल्याने सर्वत्र पालेभाज्यांचे नुकसान झाले आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवडयापासून बाजारपेठेत भाजीपाल्याच्या दरात दुपटीने वाढ होत चालली आहे. त्यामुळे सामान्य नागीरीकांच्या खिसाला कात्री लागत आहे. महात्मा फुले कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवसेनदिवस भाज्यांची आवक घटत चाल्याचा अंदाज येथील व्यार्पा­यांनी वर्तविला आहे. अजून काही दिवस अशीच परिस्थीत राहीली तर पालेभाज्यांचे दर गगनाला भीडतील असे मत मिनाझ बागवान यांनी एकमतशी बोलताना व्यक्त्त केले आहे.

शहरातील किरकोळ बाजारपेठेत चड्या दराने विक्री होणा-या भाजीपाल्यांचे दर प्रतिकिलो प्रमाणे मिरची ७० रुपये किलो, वांगे ८० ते ९० रुपये किलो, गवार ७० ते ८० रुपये किलो, भेंडी ६० ते ७० रुपये किलो, शेवगा १२० ते १४० रुपय किलो, दोडका ६० ते ७० रुपये किलो, फुळगोबी ५० ते ६० रुपये किलो, शिमला मिरची ५० रुपये किलो, टोमॅटो २० ते ३० रुपये किलो, काकडी २० ते ३० रुपये किलो, मेथी १५ ते १८ रूपये पेंडी, पालक २५ ते ३० रुपये किलो, कोथींबीर २५ ते ३५ रुपये किलो, हिरवी मिरची ३५ ते ४० रुपये किलो, कांदा २० ते ३० रुपये किलो, अद्रक १०० ते १२० रुपये किलो, कांदा पात १५ रुपये पेंडी, गाजर १५ ते २० रुपये किलो, बटाटा १७ ते १८ रुपये किलो, लिंबू १५ ते २० रुपये किलो, पत्ताकोबी १५ ते २० रुपये किलो, लसूण १८० ते २३० रुपये प्रतिकिलोत किरकोळ बाजारात विक्री केली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR