सोलापूर: शाळा ही विद्यार्थिनींच्या आयुष्यात महत्वाची भूमिका बजावते मी या शाळेची माजी विद्यार्थिनी आहे, याचा मला रास्त अभिमान आहे. प्रत्येक विद्यार्थिनीने आपल्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी वेळ आणि अभ्यासाचे योग्य नियोजन करून ध्येय गाठायचे आहे. आपल्या शैक्षणिक यशामध्ये आपल्या शाळेचा आणि गुरुंचा महत्त्वाचा वाटा असतो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थिनींनी शाळेची आठवण कायम मनात ठेवली पाहिजे, असे मत ज्येष्ठ लेखिका दीपाली दातार-पतकी यांनी व्यक्त केले.
येथील सेवासदन प्रशालेचे स्नेहसंमेलन आणि वार्षिक पारितोषिक वितरण शाळेच्या माजी विद्यार्थिनी आणि लेखिका दिपाली दातार- पतकी यांच्या प्रमुख उपस्थित झाले. त्यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. याप्रसंगी सेवासदन संस्थेच्या सचिवा वीणा पतकी, सेवासदन संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. राजीव प्रधान, शालेय समितीचे अध्यक्ष विद्या लिमये, कार्यकारिणी सदस्य पद्माकर कुलकर्णी,
अॅड. अर्चना कुलकर्णी-जोशी, मुख्याध्यापिका राजेश्री रणपिसे, प्राचार्य डॉ. सतीश कुलकर्णी, मुख्याध्यापिका संगीता आपटे उपमुख्याध्यापिका नंदिनी बारभाई, पर्यवेक्षिका स्वाती पोतदार, शिक्षक प्रतिनिधी सतीश घंटेनवरू, विद्यार्थिनी पंतप्रधान प्रतिनिधी किर्ती गायकवाड, शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधी ज्योती गोडसे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शीला मिस्त्री यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
संगीत शिक्षक विलास कुलकर्णी यांनी रचलेले व संगीतबद्ध केलेले स्वागतगीताचे सादरीकरण झाले. हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले. अहवाल वाचन सतीश घंटेनवरू यांनी केले. आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार पूनम लगड इयत्ता १० वी क, व अष्टपैलू विद्यार्थिनी पुरस्कार स्नेहा पवार इयत्ता १० वी व यांना प्रदान करण्यात आला. प्रास्ताविक मुख्याध्यापिका राजेश्री रणपिसे यांनी केले. सूत्रसंचालन अश्विनी मोरे-वाघमोडे यांनी केले.
सूत्रसंचालन संगीता नगरकर व सूत्रसंचालन रुपाली पवार यांनी केले. यावेळी संस्थेचे माजी सचिव केदार केसकर, माजी मुख्याध्यापिका शीला पत्की, माजी उपमुख्याध्यापिका लता पोटफोडे, नामदेव राठोड, माजी शिक्षक सुपेकर, दिपाली गोन्यल, अरुण पोरे, श्रीमती सुमन पुरोहित उपस्थित होते.