उदगीर : प्रतिनिधी
उदगीर तालुका पत्रकार संघाच्या वतीने मराठवाडा स्तरीय विभागीय पत्रकारिता पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. पुरस्काराचे हे १६ वे वर्ष आहे. यंदाच्या पुरस्कारासाठी उत्कृष्ट वार्ता, शोधवार्ता आणि विकास, शाश्वत विकास वार्ता या तीन गटातील पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उत्कृष्ट वार्ता, शोधवार्ता आणि विकास व शाश्वत विकास वार्ता या तीन गटातील स्पर्धेसाठी मराठवाड्यातील दैनिकाच्या प्रतिनिधींनी १ डिसेंबर २०२२ ते ३० नोव्हेंबर २३ या कालावधीत दैनिकात नावासह प्रकाशित झालेलेकिंवा नाव नसल्यास संपादकाचे शिफारस पत्र आणि प्रकाशित साहित्याची मूळ प्रत, त्याच्या तीन साक्षांकित प्रतिसह पत्रकाराच्या दोन पासपोर्ट फोटो सोबत पाठवावेत. प्रवेशिका पाठवताना पॉकेटावर कोणत्या गटासाठी प्रवेशिका पाठवत आहे, त्याचा स्पष्ट उल्लेख असावा. स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका २५ डिसेंबर २०२३ पर्यंत उदगीर तालुका पत्रकार संघ, द्वारा दैनिक यशवंत विभागिय कार्यालय, नगर परिषद व्यापारी संकुल, ई बिल्डींंग पहिला मजला, उदगीर जिल्हा लातूर (पिन कोड ४१३५१७) या पत्त्यावर पाठवाव्यात.
स्पर्धेतील विजेत्यांना उत्कृष्ट वार्ता गटात प्रथम पुरस्कार जेष्ठ पत्रकार कै. महादप्पा मुद्दा यांच्या स्मरणार्थ, द्वितीय पुरस्कार स्वामी विवेकानंद महाविद्यालय वृत्तपत्र विद्या विभाग यांच्या वतीने, तृतीय पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार कै. अनंत आपंिसगेकर यांच्या स्मरणार्थ तर शोध वार्ता गटात प्रथम पारितोषिक जेष्ठ पत्रकार कै. महादप्पा मुद्दा यांच्या स्मरणार्थ, द्वितीय पारितोषिक वृत्तपत्र विद्याविभाग स्वामी विवेकानंद महाविद्यालय यांच्यावतीने, तृतीय पारितोषक कै.मोगले यांच्या स्मरणार्थ पत्रकार राजू मोगले यांच्या वतीने देण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरुप स्मृतीचिन्न, रोख रक्कम, प्रमाणपत्र असे आहे.
यंदा प्रथमच शाश्वत विकास आणि विकासाच्या संदर्भात केलेल्या लिखाणाला कै. गुणवंतराव बाजीराव सावरगावे यांच्या स्मरणार्थ गोंिवद सावरगावे यांच्या वतीने विकास आणि शाश्वत विकास विशेष पत्रकारिता पुरस्कार दिला जाणार आहे. पत्रकारानी प्रवेशिका पाठवाव्यात असे आवाहन उदगीर तालुका पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष राम मोतीपवळे, कार्याध्यक्ष एल.पी.उगीले व स्पर्धेचे संयोजक प्रा. प्रविण जाहूरे व पदाधिका-यांनी केले आहे.