लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती राम कोंबडे यांची कन्या श्रद्धा प्रज्ञा राम कोंबडे यांना महाराष्ट्र विज्ञान विद्यापीठ नाशिकच्या वतीने बॅचरल ऑफ डेंटल सर्जरी या पदवीने दि. १५ एप्रिल रोजी सन्मानीत करण्यात आले.
प्राथमिक शिक्षणापासूनच गुणवंत विद्यार्थीनी म्हणून कौतूक केलेल्या श्रद्धा कोंबडे या विद्यार्थीनीचे प्राथमिक शिक्षण वाले इंग्लिश स्कुल, माध्यमिकचे शिक्षण राजर्षी शाहू मविद्यालयात झाले. पुढे त्यांनी येथील महाराष्ट्र इन्स्टट्युट ऑफ डेंटल सायन्स अॅण्ड रिसर्च डेंटल कॉलेजमधून डेंटलचे सर्जरीचे शिक्षण पुर्ण केले. येथील एमआयटी वैद्यकीय महाविद्यालयात सोमवारी झालेल्या पदवीदान कार्यक्रमात डॉ. हणुमंत कराड, डॉ. संतोष डोपे यांच्या हस्ते श्रद्धा कोंबडे यांना बॅचरल ऑफ डेंटल सर्जरी या पदवीने सन्मानीत करण्यात आले. तसेच श्रद्धाचे वडील राम कोंबडे व आई प्रज्ञा कोंबडे यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. कार्यक्रमास प्राचार्य, सर्व प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.