सोलापूर : उमाबाई श्राविका विदयालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे प्राचार्य सुकुमार मोहोळे यांच्या मार्गदर्शनाखाली इ.१०वी व इ.१२ वी या परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विदयार्थ्यांनी शिक्षण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या कॉपीमुक्त अभियानांतर्गत
” मी शपथ घेतो की, मी फेब्रुवारी/ मार्च २०२५ च्या इ. १० वी/ इ.१२वी परीक्षेत कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब / विचारही करणार नाही.
परीक्षेस आत्मविश्वासाने व निर्भिडपणे तणाव विरहित सामोरे जाईन व चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन प्रशालेचे, पालकांचे व गुरुजनां चे नाव उज्वल करेन. जय हिंद” अशी विद्यार्थ्यांनी शपथ ग्रहण केली.
यावेळी प्राचार्य सुकुमार मोहोळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर श्री. अनंत बेळळे यांनी शपथ पत्राचे वाचन केले. यावेळी उपप्राचार्या सौ. अश्विनी पंडित तसेच इ. १०वी व इ. १२वी वर्गाचे वर्गशिक्षक आणि इ.१० वी व इ.१२ वी चे विदयार्थी उपस्थित होते.