23.7 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeलातूरश्री सत्यसाईबाबा इन्फ्रा वेंचर्स उभारणार ३७ मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्प 

श्री सत्यसाईबाबा इन्फ्रा वेंचर्स उभारणार ३७ मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्प 

लातूर : प्रतिनिधी
गेल्या अनेक वर्षांपासून बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेले लातूर येथील श्री सत्यसाईबाबा इन्फ्रह्या वेंचर्स प्रा. लि. यांनी आता सौरऊर्जा क्षेत्रात पाऊल टाकले आहे. या कंपनीने पूर्वी ५ मेगावॅटचे काम पूर्ण केले आहे. आता या कंपनीस दि. ७ मार्च रोजी लातूर जिल्ह्यासाठी ३७ मेगावॅट सौरऊर्जा निर्मिमी करण्याची परवानगी मिळाली आहे. हा प्रकल्प लातूर जिल्ह्यात उभारला जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फ डणवीस यांनी या कामाचा कार्यारंभ आदेश सह्याद्री गेस्ट हाऊस, मुंबई येथे श्री सत्यसाईबाबा इन्फ्रह्या वेंचर्स प्रा. लि. या कंपनीस दिला आहे.
केंद्र शासनाच्या कुसूम ‘सी’ ही नैसर्गिक ऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन देणारी योजना सध्या देशात राबविली जात आहे. त्याअंतर्गत महाराष्ट्रामध्ये २.० मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना राबविण्यात येत आहे. याअंतर्गत विविध कंपन्यांकडून सौरऊर्जा निर्मिती संदर्भात निविदा मागविण्यात आल्या होत्या. यामध्ये श्री सत्यसाईबाबा इन्फ्रह्या वेंचर्स प्रा. लि. या कंपनीची महाराष्ट्र शासनाने सौरऊर्जा प्रकल्पासाठी निवड केलेली आहे. शेतक-यांना माफ क दरात १२ तास कृषी पंपाला वीज पुरवठा होणार आहे. त्यामुळे शेतक-यांना मोठ्या प्रमाणात फह्यायदा होणार आहे.
या प्रकल्पाच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे कार्यारंभ आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फ डणवीस यांच्या हस्ते श्री सत्यसाईबाबा इन्फ्रह्या वेंचर्स प्रा. लि. या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर दिनेश दिलीपराव माने व डायरेक्टर रितेश दिलीपराव माने यांना सुपूर्द करण्यात आले आहे. या प्रकल्पाचे काम मिळाल्याबद्दल दिनेश व रितेश यांनी देवेंद्र फ डणवीस यांचे आभार मानले. त्यासोबतच नव्या क्षेत्रात उमेदीने पदार्पण करणा-या श्री सत्यसाईबाबा इन्फ्रह्या वेंचर्स प्रा. लि. या कंपनीस देवेंद्र फ डणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR