27.8 C
Latur
Thursday, January 30, 2025
Homeलातूरश्री सिद्धेश्वर यात्रा महोत्सवाची गौरवशाली परंपरा वृद्धींगत होणार 

श्री सिद्धेश्वर यात्रा महोत्सवाची गौरवशाली परंपरा वृद्धींगत होणार 

लातूर : प्रतिनिधी
लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या वतीने महाशिवरात्रीचे औचित्य साधुन यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी या महोत्सवाचे ७२ वे वर्ष असून गेल्या ७० वर्षात यात्रा महोत्सवाने गौरवशाली परंपरा उंचावत नेलेली आहे. यापूढील काळात ही परंपरा अधिक वृद्धींगत करण्यासाठी विश्वस्तांसह शिवभक्तांनी योगदान देऊन यात्रा महोत्सवाचा नावलौकीक संपूर्ण देशभरात करावा, असे आवाहन देवस्थानचे ज्येष्ठ विश्वस्त विक्रम गोजमगुंडे यांनी केले आहे.
लातूर शहरातील श्री सिध्द्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या वतीने आयोजित करण्यात येणा-या यात्रा महोत्सवाच्या पुर्व तयारीसाठी देवस्थानचे प्रशासक सचिन जांबुतकर यांच्या अध्यक्षतेखाली देवस्थान सभागृहात बैठक पार पडली. याप्रसंगी विक्रम गोजमगुंडे बोलत होते. या बैठकीस विश्वस्त अशोक भोसले, बाबासाहेब कोरे, नरेशकुमार पंड्या, सुरेश गोजमगुंडे, रमेशसिंह बिसेन यांच्यासह शहरातील प्रतिष्ठीत नागरीक व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.श्री सिद्धेश्वर यात्रा महोत्सवाचे आकर्षण मोठ्या प्रमाणात असून लातूर जिल्ह्यासह पर जिल्ह्यातील व कर्नाटक राज्यातील भाविक व नागरीकांची मोठया प्रमाणात गर्दी असल्याचे सांगुन विक्रम गोजमगुंडे यांनी या यात्रा महोत्सवाने गौरवशाली परंपरा जोपासली असल्याचे सांगीतले.
गत ७० वर्षात यात्रा महोत्सवाने  वेगवेगळे उपक्रम राबवून यात्रा महोत्सवाचे आकर्षण वाढवले आहे. हा यात्रा महोत्सव आपल्या सर्वांचाच असून सर्वांनी मिळून अधिक उत्साहाने योगदान दिल्यास या यात्रा महोत्सवाची गौरवशाली परंपरा वृद्धींगत होणार आहे. श्री सिध्देश्वर मंदिर परीसराचा अधिकचा विकास व्हावा आणि यात्रा महोत्सव यशस्वी होवून त्याचा नावलौकीक देशभरात होण्यासाठी शासन व प्रशासन सहकार्य करणारच आहे मात्र शासन आणि प्रशासना सोबत लोकसहभागही तितकाच महत्वाचा असून हा सहभाग वाढविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रीतपणे योगदान द्यावे, असे आवाहन विक्रम गोजमगुंडे यांनी यावेळी केले.
देवस्थानचे प्रशासक सचिन जांबुतकर यांनी यात्रा महोत्सव यशस्वी होण्यासाठी विश्वस्त यांच्यासह शिवभक्त व नागरीकांनी ज्या ज्या सुचना दिलेल्या आहेत त्याचा योग्य विचार करुन त्या अमलात आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करेन, अशी ग्वाही दिली. यात्रा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी या बैठकीत विविध समित्या गठीत करण्यात आल्या. यामध्ये स्वागत समिती, झेंडा मिरवणूक समिती, श्री सिध्देश्वर यात्रा स्टॉल समिती, पशु व कृषी प्रदर्शन समिती, कुस्ती समिती, भोजन समिती, भजन व किर्तन समिती, अभिषेक समिती, संरक्षण समिती, स्वयंसेवक समिती, लाईट व पाणी पुरवठा समिती, प्रसाद वाटप समिती, पास दर्शन समिती, रुद्राभिषेक व महिला स्पर्धा समिती, रचना व सजावट समिती, प्रसिध्दी समिती आदी समित्यांचा समावेश आहे.
याबैठक प्रसंगी विश्वस्त अशोक भोसले, बाबासाहेब कोरे, नरेशकुमार पंड्या, रमेशसिंह बिसेन यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित प्रतिष्ठीत नागरीक व शिवभक्त यांनी विविध सुचना केल्या. जेष्ठ विश्वस्त विक्रम गोजमगुंडे यांचा वाढदिवसा निमित्त विविध समित्यांच्या वतीने एकत्रीतपणे सत्कार करुन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या बैठकीचे प्रास्तावीक व सुत्रसंचलन व्यंकटेश हलिंगे यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR