नागपूर : प्रतिनिधी
दयाभावनेने संघाचे हे सेवेचे काम चालत नाही. समाजाप्रती प्रेम आहे. वास्तवात समाजातील सर्वांना दृष्टी द्यायची आहे. सदासर्वदा जीवनात जी दृष्टी आवश्यक आहे, जीवनात परिस्थितीनुसार जे काही मिळाले आहे, त्या परिस्थितीचा चांगला उपयोग करून आपल्या जीवनाला सार्थक बनवणे आणि निरायम बनवण्यासाठी जीवनाची जी दृष्टी पाहिजे ती दृष्टी आहे. त्याचे वर्णन म्हणजे सेवा. हेच जीवनाचे सूत्र आहे. एक तास संघाच्या शाखेत स्वयंविकास आणि २३ तास समाजाची सेवा, याचदृष्टीने हे काम सुरू असते. असेच काम सुरू राहील. काम करणा-यांचा भावही हाच राहणार आहे, असे ते पुढे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूर दौ-यावर आहेत. याठिकाणी त्यांनी ‘माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर’ची पायाभरणी केली. नागपूरमधील माधव नेत्रालय आय इन्स्टिट्यूट आणि रिसर्च सेंटरचा विस्तार करून बांधण्यात आली आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवतदेखील उपस्थित होते. या कार्यक्रमात मोहन भागवत म्हणाले, एखाद्याच्या क्षमतेनुसार समाजात योगदान देणे महत्त्वाचे आहे. सेवाकार्य हे दयाभावनेने नाही तर प्रेमाने केले पाहिजे. स्वयंसेवक स्वत:साठी नाही तर इतरांसाठी काम करतात.’
‘शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा आहे. नेत्रहिनांची समस्या राहावी हे समाजाला शोभत नाही. हा समाज माझा आहे. त्यामुळे समाजाच्या सामर्थ्यासाठी जे काही करायचे ते करत राहीन. प्रामाणिकपणे, तन-मन-धनाने आणि श्रद्धेने हे काम करत राहीन. संघाचे कार्यकर्ते अनेक क्षेत्रात कार्यरत आहेत, ते याच प्रेरणेने. आज सर्वच क्षेत्रांत सेवा सुरू आहे. छोटे-मोठे प्रकल्प आणि उपक्रमात दीड लाखाहून अधिक समाजासाठी काम सुरू आहे. याच प्रेरणेतून हे काम सुरू आहे. हीच प्रेरणा आहे. स्वयंसेवक स्वत:साठी काहीच हाव ठेवत नाही. सर्वांसाठी काम करत आहेत. बदल्यात त्यांना काहीच हवे नसते. ते काम करत आहेत. समाजानेही स्वयंसेवकांच्या कामाची कदर केली. त्यामुळेच संघ स्वयंसेवक पुढे जात आहे, असे मोहन भागवत म्हणाले.