16.9 C
Latur
Thursday, November 21, 2024
Homeमहाराष्ट्रसंजय राऊतांना दिलासा; कोर्टाने दिला जामीन

संजय राऊतांना दिलासा; कोर्टाने दिला जामीन

मुंबई : प्रतिनिधी
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणात शिवडी कोर्टाने त्यांना दोषी ठरवले होते. कोर्टाने संजय राऊतांना १५ दिवसांची कोठडी व २५ हजारांचा दंड देखील ठोठावला होता. शिक्षा सुनावली गेल्यानंतर संजय राऊतांनी सत्र न्यायालयात धाव घेतली. सत्र नायायालयाने संजय राऊतांना जामीन मंजूर केला आहे.

दरम्यान, मेधा सोमय्यांनी २०२२ मध्ये संजय राऊतांविरुद्ध अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. शिवडी कोर्टाने राऊतांना शिक्षा सुनावल्यानंतर राऊतांनी सत्र न्यायालयात धाव घेतली व अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यानंतर याचिकेवर झालेल्या सुनावणीत राऊतांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. १५ हजारांच्या जातमुचलक्यावर संजय राऊतांना जामीन मंजूर झाला आहे. तसेच पुढील ३० दिवसांच्या आत वरच्या कोर्टात दाद मागण्याची मुभादेखील सत्र न्यायालयाने दिली आहे.

मीरा-भाईंदरमधील टॉयलेट घोटाळ्यात मेधा सोमय्या यांचा सहभाग असल्याचा संजय राऊत यांनी आरोप केला होता. याविरोधात मेधा सोमय्या यांनी शिवडी कोर्टात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. याप्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. या निकालाची आज (२६ सप्टेंबर) सुनावणी पार पडली. त्यानंतर न्यायालयाने संजय राऊत यांना २५ हजार रुपये दंड आणि १५ दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. हा संजय राऊत यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात होता. मात्र आता सत्र न्यायालयाने राऊतांना जामीन दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR