सोलापूर : परभणी येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधानाच्या शिल्पाची मनुवादी व्यक्तींनी विटंबना करुन तोडफोड करण्यात आली असून सदर इसमावावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी व ऑफ इंडिया (आठवले गट) मार्फत निवेदन देण्यात आले.
भारतीय संविधान ७५ व्या अमृत महोत्सव साजरा करीती असतांना व भारताची प्रगती जगभरात नावलौकिकांत भर घालत असतांना भारत देश आज विविध जाती धर्माला एकसंघ देवून दैदिप्यमान प्रगती करीत आहे. मात्र काही व्यक्तींच्या वृत्तीमुळे सामाजिक सलोखा बिघडण्याचा प्रमाण चालु आहे
तरी वरील वृत्तीमुळे सामाजिक सलोखा बिघडविण्याचे प्रमाण चालु आहे तरी वरील कृत्य हे अतिशय गंभीर स्वरुपाचे असून सदर व्यक्तींवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा असे निवेदन रिपाई आठवले गटातर्फे जिल्हा सचीव सोमनाथ घोडकूंबे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षकांना देण्यात आले.
निवेदनावर विशाल माने,सतीश शींदे,बाबासाहेब माने,संगमेश्वर जाधव,सुनील रणखांबे,राहुल बनसोडे,हेमंत जंगलबाग यांच्या स्वाक्षर्या आहेत.