मुंबई : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचे काम केले. परंतु ंिहदुस्थानची जनता रशिया, बांग्लादेश, पाकिस्तान सारखी परिस्थीती होऊ देणार नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान कोणत्याही परिस्थितीत अबाधित ठेवू. भाजपा, आरएसएस व नरेंद्र मोदींनी लाख प्रयत्न केले तरी ते संविधानाला हात लावू शकणार नाहीत, बदलू शकणार नाहीत आणि तसे प्रयत्न केले तर भाजपाचे नामोनिशान राहणार नाही, असा इशारा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी दिला.
मुंबईत बीकेसी येथे आयोजित सभेला काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड, शिवसेना खासदार संजय राऊत, तुषार गांधी आदी उपस्थित होते. नरेंद्र मोदी नेहमी विचारतात की, ७० वर्षात काँग्रेसने काय केले? काँग्रेसने लोकशाही व संविधान वाचवले नसते तर नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान कधीच झाले नसते. मोदींची गॅरंटी खोटे बोलणे आहे. १५ लाख रुपये देणार, दरवर्षी २ कोटी नोक-या देणार, शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करु असे म्हणाले पण मोदींनी यातील काहीही केले नाही. नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत येणार नाहीत तर इंडिया आघाडी ३०० जागा ंिजकून सत्तेत येईल असा विश्वासही खर्गे यांनी व्यक्त केला.
मोदींचे वागणे पुतीन सारखे : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरंिवद केजरीवाल म्हणाले की, पंतप्रधान देशाला हुकूमशाही कडे घेऊन जात आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले ते हळूहळू संपवण्याचे काम भाजपा करत आहे. दिल्लीत आम आदमी पक्षाचा नरेंद्र मोदी सामना करु शकत नाहीत, हरवू शकत नाहीत. म्हणून खोटी तक्रार करुन मला जेलमध्ये टाकले. गरीब मुलांना चांगले शिक्षण व आरोग्याची सुविधा उपलब्ध केली हेच मोदींना नको आहे. त्यासाठीच मला अटक करण्यात आली. २ तारखेला पुन्हा जेलमध्ये जावे लागणार आहे. पण इंडिया आघाडीचे सरकार आले तर मात्र त्यांना जेलमध्ये जावे लागणार आहे. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी सर्व विरोधकांना एक तर जेलमध्ये टाकलेकिंवा त्यांना संपवले. नरेंद्र मोदी भारतातील विरोधकांना जेलमध्ये टाकत आहेत. बांग्लादेशातही तेच चालले आहे. पाकिस्तानतही तेच चालले आहे, मोदी सुद्धा भारताला पाकिस्तान, बांग्लादेश बनवू पहात आहेत. मोदी सरकार पुन्हा आले तर ठाकरे, शरद पवार प्रियंका गांधी सर्व विरोधी नेत्यांना जेलमध्ये टाकले जाईल, अशी भिती केजरीवाल यांनी व्यक्त केली.