सोलापूर -संस्कृत भारती तर्फे सोलापूर जिल्हा संस्कृत संमेलन शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी संगमेश्वर महाविद्यालय येथे आयोजित केलेले आहे. संस्कृत भारती 45 वर्षापासून संस्कृतचा प्रचार व प्रसार करत आहे. त्यातीलच एक भाग म्हणजे संस्कृत प्रेमींसाठी, शिक्षक, विद्यार्थी, सामाजिक संघटना यांच्यासाठी एक दिवसाचे 29 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10 ते 5.30 पर्यंत संगमेश्वर महाविद्यालय येथील डी 206 या सभागृहामध्ये संपन्न होणार आहे.
यामध्ये संस्कृत विषयक चर्चा, भविष्यातील स्थान, आप की अदालत, गटचर्चा, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी विषयांवर चर्चासत्र होणार आहे, तसेच विज्ञान प्रदर्शनी असणार आहे. सम्मेलनाचे उद्घाटन धर्मराज काडादी यांच्या हस्ते होणार आहे तसेच संस्कृत भारती नाशिक येथील गजानन अम्बुरे मार्गदर्शन करणार आहेत. अध्यक्ष स्थानी डॉ नारायण देशपांडे (बार्शी) असतील. जिल्ह्यातील सर्व संस्कृत प्रेमी, संस्था, शिक्षक, विद्यार्थी यांनी उपस्थित रहावे असे आव्हान सोलापूर जिल्हा संयोजक निखिल बडवे यांनी केले आहे.