परभणी : सकारात्मक विचाराने सुख, शांती, उत्साह, उन्नती, विकास, आत्मविश्वास, स्फुर्ती, उर्जा निर्माण होते. यामुळे आपले तन, मन, धन व चांगले संबंध निर्माण होवून जीवन जगणे सहज सोपे होते. तर नकारात्मक विचाराणे दु:ख, दरिद्रता, अशांती, पतन, कष्ट, पीडा, परेशानी, अडचणी निर्माण होतात. नकारात्मक कारणामुळे होणारे कार्य बिघडतात. परिणामी जिवनात जे पाहिजे ते मिळवण्यास मनुष्य अयशस्वी होतो. त्यामुळे जीवनात विचार, वाणी, व्यवहार सकारात्मक ठेवल्यास आत्मविश्वासपूर्ण आयुष्य जगता येते असे प्रतिपादन नारीरत्न श्रीमती राजेश्वरीजी मोदी (राज दीदी) यांनी केले.
नारायण रेकी सत्संग परीवार परभणीच्या वतीने आजीवन खुश रहने का मंत्र या कार्यक्रमाचे रविवार, दि.१ डिसेंबर रोजी राजलक्ष्मी लॉन, पाथरी रोड येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रीमती राजेश्वरीजी मोदी बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, चुकीची कामे नाकरात्मक उर्जाला आकर्षित करतात. त्यामुळे आपल्याला आयुष्य जगताना अडचणींचा सामना करावा लागतो. पृथ्वीतलावरील सर्वांना आयुष्यभर आनंदी राहण्याची इच्छा असते.
त्यासाठी प्रत्येकाला सकारात्मक विकासांची कास धरणे अत्यावश्यक आहे. घरातल्यांशी भांडून मिळवलेली संपत्ती नकारात्मक उर्जा घेवून येत असल्याने तुम्हाला संपत्ती मिळाली तरी जिवनात समाधान मिळणार नाही. प्रत्येक मनुष्य आपल्या जिवनात कर्माचे फळ भोगत असतो. इमानदारीच्या मार्गावरून चालण्याऐवजी तुम्ही बेईमानीच्या मार्गावरून चाललात तर तुम्हाला अडचणीं सामना निश्चीत करावा लागणार. त्यामुळे आई, वडीलांची काळजी करा, त्यांचे म्हणणे ऐका तुम्हाला जिवनात काही कमी पडणार नाही असा विश्वास यावेळी श्रीमती राजेश्वरीजी मोदी यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमात श्रीमती राजेश्वरीजी मोदी यांनी अनेक उदाहरणांद्वारे सकात्मक गोष्टींचे जिवनात होणारे फायदे उपस्थितांना समजावून सांगितले. या कार्यक्रमास माहेश्वरीज समाज बांधवासह, महिला, युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परभणी तालुका माहेश्वरी मंडळासह संपूर्ण राजस्थानी महिला मंडळाने परिश्रम घेतले.