16.2 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeसगे सोयऱ्यांचा शासन निर्णय काढू नका : ओबीसी नेत्यांचा सूर

सगे सोयऱ्यांचा शासन निर्णय काढू नका : ओबीसी नेत्यांचा सूर

मुंबई : मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी आंदोलक मनोज जरांगे यांनी काही मागण्या सरकार समोर ठेवल्या आहेत. तर दुसरीकडं याला ओबीसी नेत्यांनी कडाडून विरोध केला आहे. यापार्श्वभूमीवर सर्वमान्य तोडगा निघावा यासाठी आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन सह्याद्री अतिथीगृहावर करण्यात आलं होतं.

या बैठकीच्या सुरुवातीलाच गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं. तसंच सगे-सोयऱ्यांचा शासन निर्णय काढू नका, असा सूर यावेळी ओबीसी नेत्यांमध्ये पाहायला मिळाला.

जर सगे-सोयरे हा शासन निर्णय काढला तर ओबीसींचं फार मोठ नुकसान होईल. त्याचसोबत कुणबी प्रमाणपत्र देण्याचंही थांबावा, अशा प्रकारची भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतली. यावेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्र्यांनी ऐकून घेण्याची भूमिका घेतली.

दरम्यान, बैठकीत विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे विरोधीपक्ष नेते अर्थात विधानसभेचे विजय वडेट्टीवार तसंच अंबादास दानवे यांनी बहिष्कार टाकला. त्यामुळं ही बैठक सर्वपक्षीय असली तरी त्यात विरोधीपक्षाचं प्रतिनिधीत्व दिसलं नाही. बैठकीला विरोधकांनी दांडी मारल्यानं बैठकीत विरोधकांच्या खुर्च्या रिकाम्या दिसल्या. त्यामुळं विजय वडेट्टीवार, नाना पटोले, जयंत पाटील, अंबादास दानवे यांच्या नावाच्या खुर्च्या रिकाम्या होत्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR