22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रसचिन तेंडुलकरच्या बॉडीगार्डची आत्महत्या

सचिन तेंडुलकरच्या बॉडीगार्डची आत्महत्या

मूळ गावी डोक्यात गोळ््या झाडून जीवन संपविले
जळगाव : प्रतिनिधी
एसआरपीएफमध्ये कार्यरत असलेल्या व सध्या क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या बॉडीगार्डने जळगाव जिल्ह्यातील मूळ गावी जामनेर येथे राहत्या घरी सर्व्हीस रिव्हॉल्वरने डोक्यात दोन गोळ््या झाडून घेत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना बुधवारी मध्यरात्री दीड वाजता घडली. दरम्यान, सर्व आलबेल असताना या जवानाने टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रकाश गोविंदा कापडे (३९ रा. गणपतीनगर, जामनेर) असे मृत जवानाचे नाव आहे.

प्रकाश कापडे मागील १५ वर्षांपासून एसआरपीएफ जवान म्हणून मुंबई पोलिस विभागात कार्यरत होते. सहा महिन्यांपासून सचिन तेंडुलकर यांच्याकडे बॉडीगार्डचे ते काम पाहत होते. चार दिवसांपूर्वी मतदानाकरिता जळगाव जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी जामनेरला सुटी असल्याने आले होते. दोन दिवसांपूर्वी ते परिवारासह शेगाव येथे दर्शनासाठी गेले होते. जामनेर येथील गणपतीनगरात आई, वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ, वहिनी अशा परिवारासह रहात होते.

तीन दिवसांपासून प्रकाश कुटुंबासह हसतखेळ वावरत होते. काल मंगळवारी रात्री जेवण केल्यानंतर सर्व कुंटुंबातले सर्वजण झोपले. रात्री १.३० वाजता प्रकाश कापडे हे घराच्या वरच्या बाजूला असलेल्या खोलीत गेले. त्या ठिकाणी सर्व्हीस रिव्हॉल्वरने डोक्यात दोन गाळ््या झाडून घेतल्या. त्यानंतर ते जागेवरच कोसळले.

मुंबईला जाण्यापूर्वीच टोकाचे पाऊल
प्रकाश कापडे यांची चार दिवसांची सुटी संपणार असल्याने आज बुधवारी सकाळी ८ वाजता ते मुंबईला जाणार होते. मात्र, त्यापूर्वीच त्यांनी आत्महत्या केली. दरम्यान, कुठल्याही प्रकारची चिंता नसताना त्यांनी टोकाचे पाऊल का उचलले, असा प्रश्न कुटुंबीय व नातेवाईकांनाही पडला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR