26.6 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्र  सत्ताधारी मंत्र्यांचे गुंडाला राजाश्रय

  सत्ताधारी मंत्र्यांचे गुंडाला राजाश्रय

पुणे : कुख्यात गुंड गजानन मारणे (गजा मारणे) यांनी पुण्यातील दहिहंडीच्या कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन, चंद्रकांत दादांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यामुळे चांगलेच राजकारण सुरू झाले असून, काँग्रेस नेत्यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार हल्ला चढविला आहे.राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या मुद्दावरुन भाजचे मंत्रिमहोदय गुंडाला राजाश्रय देत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या संदर्भात ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील आणि गुंड गजानन मारणे यांच्यासंबंधीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात मारणे हा मंत्रिमहोदयांना पुष्पगुच्छ देताना दिसत आहे. एका दहिहंडी कार्यक्रमातील हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ वडेट्टीवार यांनी शेअर केला असून, त्या खाली ‘लाडके गुंड’ असे कॅप्शन दिले आहे. महायुती सरकारचा लाडका गुंड गजानन मारणे याने मंगळवारी झालेल्या दहीहंडी कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मंत्री महोदयांनी देखील पुष्पगुच्छ स्वीकारून गजानन मारणेला हात जोडले, असे ही वडेट्टीवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

भाजपचे माजी मंत्री आणि विद्यमान खासदार यांनी आणि त्यांच्या मुलाने पोलिसांची इज्जत कशी काढली हे काल दिवसभर संपूर्ण महाराष्ट्राने लाईव्ह पाहिले. पोलिसांना धमकावण्याचा असा माज खासदार नारायण राणे आणि त्यांचा मुलगा निलेश राणे यांना कुठून आला हा प्रश्न जनतेला पडला होता. त्याचे उत्तर मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिले आहे. या राज्यात पोलिसांची इज्जत राहिली नाही. मंत्री गुंडांकडून सत्कार करून घेतात, आमदार पोलिसांना शिवीगाळ करून धमकावतात,

अशी सडकुन टीका काँग्रेस नेत्यांनी सत्ताधारी भाजपवर केली आहे.दरम्यान यापुर्वी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी जगा मारणेची भेट घेतली होती त्यावेळी भाजप विरोधकावर तुटून पडली होती. मात्र, आता भाजप चंद्रकांत दादामुळे तोंडघशी पडली आहे.

दरम्यान, पुण्यातील प्रसिध्द गुंड गजा मारणे पुण्यातील कोथरूड भागात वास्तव्याला आहे.तर मंत्री चंद्रकांत दादा पाटील कोथरुड मतदार संघाचे आमदार आहेत. दादा परत कोथरूडमधून निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. लोकप्रतिनिधी हे जनतेसाठी असतात मात्र निवडून येण्यासाठी आजच्या परिस्थितीत महायुतीच्या नेत्यांना लाडके गुंड महत्वाचे आहेत. यामुळेच गुंडाकडून सत्कार चमत्कार करून घेतले जात आहेत. नागरिकांना गुंडपासून संरक्षण देणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी असते, मात्र मंत्री महोदय गुंडाला राजाश्रय देत आहे, असा टोला ही विरोधी पक्ष नेत्यांनी मंत्री पाटील यांना लगावला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR